खासगी हवामान तज्ञांना प्रोत्साहन द्याच !

Homeदखल

खासगी हवामान तज्ञांना प्रोत्साहन द्याच !

राज्यात पावसाने पुन्हा रुद्रावतार धारण करत हाहाःकार माजविला आहे. येणार्‍या ४८ तासात देखील मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.वरुण देवतेच्या व

मुख्यमंत्री पदाची डेट लाईन २ महिनेच ?
अनपेक्षित निकाल, पण इंडिया आघाडीला फायद्याचा!
हिंदू समाजात सतीप्रथेनंतर प्रथमच परंपरा खंडित !

राज्यात पावसाने पुन्हा रुद्रावतार धारण करत हाहाःकार माजविला आहे. येणार्‍या ४८ तासात देखील मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.वरुण देवतेच्या वक्रदृष्टीने राज्यातील जनतेसह शेतकरी पुन्हा नागवला गेला आहे.आपले आपत्ती व्यवस्थापन सतर्क असले तरी आपत्ती आधी जी काळजी घेणे आवश्यक आहे ती नेहमीप्रमाणे यंदाही दुर्लक्षीत झाल्याने या अवकळा सोसाव्या लागत आहेत.खरे तर सरकारी मामला साराच बेभरवशाचा झाल्याने सामान्य माणसाचा बळी जात असल्याचे चित्र पहावे लागत आहे.हवामान खात्याची विद्ववत्ता खासगी क्षेत्रातील हावामान तज्ञांना अस्पृश्य ठरवू लागल्याचाच हा दुष्परिणाम आहे.

कोकणासह, मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रात पावसाने रुद्रावतार धारण केला आहे. कोकणात ढगफुटीसह मुसळधार पावसाने हजेरी लावली.कोकणातील चिपळूण, रत्नागिरीत दापोलीत, वासिष्ठी नदीचे पाणी घुसले.तर विदर्भात अमरावती, अकोला यवतमाळ, गोंदीया, जिल्हयात पावसाने कहर केला असून गोंदिया जिल्हयातील बाघ नदीच्या पाण्यात चार तरुणांचा बुडून मृत्यु झाला असून मोठया प्रमाणात शेतीचे नुकसान झाले आहे.यवतमाळ जिल्हयात दोन युवक वाहुन गेले. लातुर, बीड जिल्हयात कपिल धरणाचा धबधबा पाहण्यासाठी गेलेले तिन्ही पर्यटक पाण्यात वाहुन गेलेत. राज्यात एकूण 22 जण पुराच्या पाण्यात वाहुन गेले असून वृक्ष व घरांच्या पडझडीमुळे अनेक गुरे दगावली तर अनेक गुरे जखमी झाली आहेत. काही गुरे पाण्यात वाहुन गेल्याने शेतकरी वर्ग पूरता नागवला गेला आहे.तब्बल चाळीस दिवसाच्या प्रतिक्षेनंतर पावसाला सुरुवात झाली. शेतकरी वर्गाला अमावस्थेला पाऊस होऊन पोळा सणाला बैलांची शिंगे ओली होतील अशी आशा होती. त्याप्रमाणे पाऊस आलाही. परंतु पाऊस झाल्यानंतर शेतकर्‍यांच्या मनात आनंद निर्माण होण्याऐवजी त्यांच्या डोळयात अश्रुधारा वाहु लागल्या आहेत.कारण पावसाने धारण केलेला रुद्रावतार आणि माजविलेला हाहाःकार शेतकर्‍यांना आनंद देण्याऐवजी दुःख देवून गेला. विरोधीपक्ष या अतिवृष्टीत देखील शेतकर्‍यांच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी, त्यांच्या मदतीची भुमिका स्विकारण्याऐवजी मंदीरे उघडण्यासाठी रस्त्यावर उतरण्याची भाषा वापरत आहे. राजकारण करा परंतु शेतकर्‍यांच्या डोळयात ‘अश्रु’ असतांना ‘घंटा’ वाजण्यापेक्षा त्यांना ताबडतोबीने आर्थिक मदतीसाठी सरकारकडे आग्रह धरायला हवा.पंचनामे करुन ज्या शेतकर्‍यांचे नुकसान झाले असेल त्यांना मदतीसाठी सरकारवर दबाब आणण्याची भूमिका स्विकारणे गरजेचे आहे.उत्तर महाराष्ट्रात 40 गांवच्या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला असतांना धुळे, जळगांव,नंदुरबार जिल्हयात केळी, पपई, मिरची, कांदा, भाजीपाला, नाशिक, अहमदनगर जिल्ह्यातील द्राक्ष डाळींब,भाजीपाला त्यासह अनेक पिके भुईसपाट झाली आहेत. अनेक शेते वाहुन गेली आहेत. जामनेर तालुक्यात अतिवृष्टीने कहर केला आहे. जळगांव भुसावळ,अमळनेर, पारोळा, एंरडोल, मुक्ताईनगर,या सर्व तालुक्यामध्ये पावसाने थैमान घातले आहे.धुळे शिरुड, बोरकुंड, मोरदड, खोरदड, विचुंर, चांदे, नाणे-सिताणे दोंडवाड, मांडळ, रतनपुरा, तरवाडे, जुनवणे निमगुळ, परिसरात अतिवृष्टी झाल्याने शेतकर्‍यांचे मोठया प्रमाणावर नुकसान झाले आहे.राज्यात अनेक जिल्हयात घराची पडझड मोठया प्रमाणावर झाली असून मृत्यू पावलेल्या नागरिकांची संख्याही मोठी आहे. तसेच मृत्यु पावलेल्या गुरांची संख्याही फार मोठी आहे. विशेषतः बैल, दुभत्या गायी, म्हशीची मृत्यू झाल्याने शेतकर्‍यांचे शेतीचे नुकसानीसह पशुधनही हातातुन गेले अशी स्थिती आहे. राज्यातील धरणांचे दरवाजे खुले केल्याने नद्या ओसाडूंन वाहत आहेत त्यामुळे नदी काठी असलेली घरे, झोपडया, शेतकर्‍याची खळे पाण्यात वाहुन गेले आहेत.अनेक जिल्हयात तलाव फुटले आहेत. गांवामध्ये पाणीच पाणी साचल्याने घरांमध्ये, दुकानांमध्येही पाणी शिरल्याने नागरिकांचे नुकसान झाले आहे. पावसाची आतुरतेने वाट पाहणारा शेतकरीच पावसाने नागवला गेला, अशी परिस्थिती आहे.पर्यावरणात आमुलाग्र बदल झाल्याने येणार्‍या काळात शेती करावी की नाही अशी परिस्थिती निर्माण होणार आहे. जळगांव जिल्हयात केळीचे नुकसान झाल्याने धाय कोलमडून रडणारा शेतकरी पुन्हा उभा करण्याची आवश्यकता आहे. तर मराठवाडा, विदर्भ, कोकण, सिधुंदूर्ग मध्य महाराष्ट्र,उत्तर महाराष्ट्राला पावसाने दिलेला तडाखा हा शेतकर्‍याचे कंबरडे मोडणारा आहे. शेतकर्‍यांना या पावसात झालेली नुकसान भरपाई रोखीच्या स्वरुपात ताबडतोबीने देण्याची योजना सरकारने राबवावी अशी परिस्थिती आहे.शेतकर्‍यांच्या डोळयात अश्रु आहेत. अतिवृष्टीने दिलेला मार हा खरीप हगांमावर असल्याने हाती काय येईल? हा चिंतेचा मुद्दा आहे.


कोकणात पर्जन्य राजाने दाखवलेल्या त्रासिक चमत्कारानंतर उत्तर महाराष्ट्रातही ढगफुटीचे संकट आले.खरे तर ढगफुटी अचानक होते हा दावा अगदीच न पटणारा आहे,आठ ते बारा तास अगोदर ढगफुटीचा अंदाज येतो,त्यासाठी आवश्यक असलेली ओक्टोम्बर रडार ही यंत्रणा आपण उभी करू शकलो नाही हे आपले अपयश आहे,सोलापुर आणि महाबळेश्वर वगळता अशा प्रकारचे ओक्टोम्बर रडार आपल्याकडे इतरत्र कुठेच उपलब्ध नाही.या शासकीय उदासीनतेचाच परिणाम सामान्य माणूस भोगतो आहे,ओक्टोम्बर रडार सारखी यंत्रणा किमान प्रत्येक महसूल विभागात आपण उभी करू शकलो तर संभाव्य ढगफूटीचा अंदाज किमान आठ तास येऊ शकतो,या कालावधीत जनावरे,पिके आणि माणसाही वाचविता येऊ शकतात.मात्र ही बाब शासनस्तरावर आणि प्रशासन स्तरावारही कुणी गांभिर्याने घ्यायला तयार नाही.खासगी क्षेत्रातही अनेक विद्वान हवामा तज्ञ काम करीत आहेत.त्यांनी गेल्या दहा वर्षात वर्तवलेले अंदाज कित्येक प्रमाणात खरे ठरले आहेत,या अंदाजाकडे हवामान खात्याने केवळ दुर्लक्षच केले नाही तर दबावतंत्राचा वापर करून असे अंदाज वर्तवण्यापासून या मंडळींना परावृत्तही केले,ही मंडळी पुन्हा ओक्टोम्बर नोव्हेंबर डिसेंबर या कालावधीत विदर्भ मराठवाड्यासह महाराष्ट्राच्या विविध भागात ढगफूटी होऊ शकते असा अंदाज वर्तवीत आहे,या अंदाजाकडे दुर्लक्ष न करता आवश्यक त्या उपाय योजना करण्यासाठी पाऊले उचलायला हवीत.अंदाज खोटा ठरला तरी नुकसान काही होणार नाही,पण सावधगीरी बाळगली तर निष्पाप बळी आणि आर्थिक नुकसानीचे पातक तरी डोक्यावर येणार नाही.

COMMENTS