Homeताज्या बातम्या

अगस्ति विद्यालयात नवागतांचे उत्साहात स्वागत; नव्या शैक्षणिक वर्षाचा ‘शाळा प्रवेशोत्सव’ संपन्न

अकोले : येथील अगस्ती एज्युकेशन सोसायटी संचलित अगस्ति विद्यालयात नवीन शैक्षणिक वर्षाचा प्रारंभ ‘शाळा प्रवेशोत्सव’ने झाला. नवागत विद्यार्थ्यांचे गु

‘शिशु संगोपन’च्या विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती परीक्षेत यश; फिरोदिया प्रशालेचा ७९, तर गुगळे हायस्कूलचा ८५ टक्के निकाल
बीडमध्ये श्रीकृष्ण गुरुकुलचे संस्थापक अध्यक्ष गणेश काळे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा; मान्यवरांची उपस्थिती
मतपत्रिकेमुळे पंजाबमध्ये ‘कमळ’ कोमेजले; निकालही बदलले : प्रकाश आंबेडकर यांचा दावा

अकोले : येथील अगस्ती एज्युकेशन सोसायटी संचलित अगस्ति विद्यालयात नवीन शैक्षणिक वर्षाचा प्रारंभ ‘शाळा प्रवेशोत्सव’ने झाला. नवागत विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प देऊन वाद्यांच्या गजरात उत्साहात स्वागत करण्यात आले.

शैक्षणिक नववर्ष कार्यक्रमाची सुरुवात सरस्वतीचे पूजन करून व छत्रपती शिवाजी महाराज, अगस्ति शिक्षण संस्थेचे संस्थापक, गुरुवर्य स्वातंत्र्यसेनानी बा. ह. नाईकवाडी सर (बाबा) व भूतपूर्व सेक्रेटरी दुर्गाबाई नाईकवाडी (आई) यांच्या प्रतिमापूजनाने झाली. यावेळी मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके व शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.

यानिमित्त संस्थेच्या अध्यक्ष शैलजा पोखरकर, कार्याध्यक्ष शिरीष नाईकवाडी व सतीश नाईकवाडी, विद्यालयाचे मुख्याध्यापक मंगेश खांबेकर यांच्यासह विद्यालयातील शिक्षक, शालेय व्यवस्थापन समिती, सखी सावित्री समिती, महिला सुरक्षा समितीचे पदाधिकारी व मोठ्या संख्येने पालक उपस्थित होते.

कार्यक्रमादरम्यान आयोजित पालक सहविचार सभेत १०वी-१२वी व शिष्यवृत्ती परीक्षेतील उज्ज्वल निकालाबद्दल शाळेचे विशेष कौतुक करण्यात आले. “याच शाळेत आमच्या पाल्याचे भवितव्य उज्ज्वल होईल”, अशी खात्रीशीर भावना यानिमित्त उपस्थित असलेल्या पालकांनी व्यक्त केली. शाळेची ही गौरवशाली निकालाची परंपरा पाहून यंदाही ५वी ते १०वीसाठी मोठ्या प्रमाणात प्रवेश झाल्याचे मुख्याध्यापकांनी आवर्जून सांगितले.

COMMENTS