Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

जयप्रभा स्टुडिओ प्रकरणी आंदोलकांचा आत्मदहनाचा प्रयत्न

कोल्हापूर / प्रतिनिधी : जयप्रभा स्टुडिओप्रश्‍नी 250 दिवस आंदोलन सुरू असूनही शासन स्तरावर कोणताही निर्णय होत नसल्याने संतप्त आंदोलकांनी जयप्रभा स्

माणसासह वाहनांच्या गर्दीने सतोबाचा डोंगर फुलला
कृष्णा नदीकाठी 8 फूटी मगर विश्रांतीला, प्रशासन सतर्क
जलसंपदा मंत्र्यांच्या आदेशानुसार राष्ट्रवादीच्या नगरसेवकांचा सभेवर बहिष्कार

कोल्हापूर / प्रतिनिधी : जयप्रभा स्टुडिओप्रश्‍नी 250 दिवस आंदोलन सुरू असूनही शासन स्तरावर कोणताही निर्णय होत नसल्याने संतप्त आंदोलकांनी जयप्रभा स्टुडिओ समोर आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी आंदोलकांना तत्काळ ताब्यात घेतले. यावेळी जयप्रभा स्टुडिओप्रश्‍नी तत्काळ निर्णय न झाल्यास मंत्रालयावर मोर्चा काढण्याचा इशारा अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे उपाध्यक्ष धनाजी यमकर यांनी दिला.
जयप्रभा स्टुडिओची जागा विक्री झाल्यानंतर कोल्हापुरातील अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ व कलाप्रेमी संघटनेच्या वतीने आंदोलन सुरू झाले. याप्रश्‍नी तत्कालीन सांस्कृतिक मंत्री यांच्यासह खासदार, आमदारांना निवेदन देण्यात आले. जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनाही निवेदन देऊन या प्रश्‍नी आत्मदहनाचा इशारा देण्यात आला होता.
शुक्रवारी सकाळी जयप्रभा स्टुडिओजवळ आंदोलकांनी जमत शासन व लोकप्रतिनिधी विरोधात घोषणाबाजी केली. यावेळी स्टेजच्या मागे काही आंदोलक हातात डिझेलचे कॅन घेऊन येताना पोलिसांनी पाहिले. हे कॅन काढून घेण्यासाठी पोलीस व आंदोलक यांच्यात झटापट झाली. पोलिसांनी कॅन फेकून देत आंदोलकांना ताब्यात घेतले. दरम्यान, या आंदोलनाला शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने पाठिंबा देण्यात आला. शिवसेनेने यापूर्वीही आंदोलनात सहभाग नोंदवून जयप्रभा स्टुडिओची जागा शासनाने ताब्यात घ्यावी. अन्यथा ती चित्रपट महामंडळाला चालवण्यास द्यावी, अशी भूमिका मांडली होती. या मागणीसाठी आंदोलकांच्या मागे ठामपणे उभे राहण्याचा निर्धार व्यक्त केला. यावेळी जिल्हा प्रमुख संजय पवार, विजय देवणे, शहरप्रमुख रविकिरण इंगवले उपस्थित होते.
जयप्रभा स्टुडिओ चित्रीकरणासाठी तत्काळ खुला झाला पाहिजे, स्टुडिओमधील इमारतीमधील खुली जागा आरक्षित राहावी व चित्रीकरण सोडून कोणताही व्यावसायिक वापर होऊ नये, स्टुडिओचे जतन होण्यासाठी राज्य शासन आणि मनपाने लक्ष घालावे आदी मागण्यांसाठी हे आंदोलन सुरू आहे. त्याची दखल घेतली जाणार नसेल; तर राज्यव्यापी आंदोलन करण्याचा इशारा चित्रपट महामंडळाचे उपाध्यक्ष धनाजी यमकर यांनी दिला.

जयप्रभा स्टुडिओ बचावसाठी गेल्या 250 हून अधिक दिवस आंदोलन सुरू आहे. पण त्याची दखल न घेतल्याने आंदोलनाने उग्र रूप धारण केले आहे. जयप्रभा स्टुडिओ संपवण्याचा घाट घालणार्‍यांना सरकारने पाठीशी न घालता स्थानिक कलाकारांची साद ऐकावी व स्टुडिओला गतवैभव प्राप्त करून द्यावे, अशी मागणी माजी खासदार संभाजीराजे यांनी ट्विट करून केली.

COMMENTS