Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

ज्येष्ठांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष; आंदोलनाचा इशारा; कर्जत तहसीलवर मोर्चा; १९ मागण्यांसाठी ‘वंचित’चा आवाज

जामखेड : ज्येष्ठ नागरिक, विधवा, परित्यक्ता व सामान्य नागरिकांच्या प्रश्नांकडे लोकप्रतिनिधींनी गांभीर्याने लक्ष द्यावे, अन्यथा त्यांच्या दारासमोर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश प्रवक्ते ॲड. डॉ. अरुण जाधव यांनी दिला. वंचित बहुजन आघाडी व महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघ (फेसकॉम) यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवारी (दि. ३० मार्च २०२६) कर्जत येथे ज्येष्ठ नागरिकांच्या विविध मागण्यांसाठी मोर्चा काढण्यात आला. जिल्हाध्यक्ष शब्बीर पठाण, ऍड. डॉ. अरुण जाधव, युवा आघाडी जिल्हाध्यक्ष सोमनाथ भैलुमे यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा निघाला. मराठी मुलांची शाळा ते कर्जत तहसील कार्यालयापर्यंत काढण्यात आलेल्या या मोर्चात सुमारे ५०० ते ६०० महिला-पुरुषांचा सहभाग होता. कर्जत तालुक्यातील विविध खेड्यांमधून ज्येष्ठ नागरिक, विधवा, परित्यक्ता तसेच एकल लोककलावंत मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी बोलताना ऍड. जाधव यांनी प्रशासनातील बेजबाबदारपणावर टीका करत कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार, विधान परिषद सभापती राम शिंदे व खासदार निलेश लंके यांनी सामान्यांच्या प्रश्नांकडे लक्ष द्यावे, अशी मागणी केली. दरम्यान, शब्बीर पठाण यांनी निवेदनातील १९ मागण्या पूर्ण न झाल्यास कर्जत तहसील कार्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला. यावेळी शशिकांत पाटील, सोमनाथ भैलुमे, तुकाराम पवार, चांगदेव सरोदे, संतोष चव्हाण आदींनीही आपली भूमिका मांडली. मोर्चात वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष दत्ता भालेराव, जिल्हा उपाध्यक्ष लखन पारसे, संजय शेलार, विकास समुद्र, शंकर गाडे यांच्यासह अनेक नागरिक उपस्थित होते.

ओबीसी समाजासाठी सदैव लढणार : मंत्री भुजबळ  
शिवसेना जात-धर्मापलीकडे काम करणारा पक्ष : बाफना  उपमुख्यमंत्री शिंदेंच्या माध्यमातून रुग्णास दोन लाखाची मदत
पाणपोई हे पुण्यकर्म नव्हे तर आरोग्य सुविधा : सावंत

जामखेड : ज्येष्ठ नागरिक, विधवा, परित्यक्ता व सामान्य नागरिकांच्या प्रश्नांकडे लोकप्रतिनिधींनी गांभीर्याने लक्ष द्यावे, अन्यथा त्यांच्या दारासमोर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश प्रवक्ते ॲड. डॉ. अरुण जाधव यांनी दिला.

वंचित बहुजन आघाडी व महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघ (फेसकॉम) यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवारी (दि. ३० मार्च २०२६) कर्जत येथे ज्येष्ठ नागरिकांच्या विविध मागण्यांसाठी मोर्चा काढण्यात आला. जिल्हाध्यक्ष शब्बीर पठाण, ऍड. डॉ. अरुण जाधव, युवा आघाडी जिल्हाध्यक्ष सोमनाथ भैलुमे यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा निघाला.

मराठी मुलांची शाळा ते कर्जत तहसील कार्यालयापर्यंत काढण्यात आलेल्या या मोर्चात सुमारे ५०० ते ६०० महिला-पुरुषांचा सहभाग होता. कर्जत तालुक्यातील विविध खेड्यांमधून ज्येष्ठ नागरिक, विधवा, परित्यक्ता तसेच एकल लोककलावंत मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

यावेळी बोलताना ऍड. जाधव यांनी प्रशासनातील बेजबाबदारपणावर टीका करत कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार, विधान परिषद सभापती राम शिंदे व खासदार निलेश लंके यांनी सामान्यांच्या प्रश्नांकडे लक्ष द्यावे, अशी मागणी केली.

दरम्यान, शब्बीर पठाण यांनी निवेदनातील १९ मागण्या पूर्ण न झाल्यास कर्जत तहसील कार्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला. यावेळी शशिकांत पाटील, सोमनाथ भैलुमे, तुकाराम पवार, चांगदेव सरोदे, संतोष चव्हाण आदींनीही आपली भूमिका मांडली.

मोर्चात वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष दत्ता भालेराव, जिल्हा उपाध्यक्ष लखन पारसे, संजय शेलार, विकास समुद्र, शंकर गाडे यांच्यासह अनेक नागरिक उपस्थित होते.

COMMENTS