देणाऱ्याची झोळी दुबळी !

Homeताज्या बातम्यासंपादकीय

देणाऱ्याची झोळी दुबळी !

विप्रोचे अजिम प्रेमजी देशातील सर्वाधिक दानशूर! हा विषय आहे की, भारतीय उद्योजक यांच्यामध्ये सध्या श्रीमंतीची स्पर्धा लागलेली आहे. कोण देशातील सर्वाधिक

उत्पादन करणाऱ्या शेतकरी समाजाला, मराठा सत्ताधाऱ्यांनी याचक बनविले!
हल्लेखोर दोषी, सूत्रधार निर्दोष !
खबरदार! ५० टक्केला हात लावला तर !

विप्रोचे अजिम प्रेमजी देशातील सर्वाधिक दानशूर! हा विषय आहे की, भारतीय उद्योजक यांच्यामध्ये सध्या श्रीमंतीची स्पर्धा लागलेली आहे. कोण देशातील सर्वाधिक श्रीमंत, कोण आशियातील सर्वाधिक श्रीमंत, कोण जगातील सर्वाधिक श्रीमंत या यादीमध्ये वरचढ असणारे उद्योजक मात्र भारतीय समाजाच्या समस्या लक्षात घेऊन त्या सोडवण्यासाठी त्यांना दान करण्यात अपुरेच पडलेले नाही तर अतिशय कफल्लक असल्यासारखं दान त्यांनी केलेलं आहे.   विप्रो चे अजिम प्रेमजी हे जागतिक श्रीमंतांच्या यादीत ४७ व्या स्थानी आहेत. तर, याच यादीत जगातील दुसऱ्या क्रमांकावर श्रीमंत म्हणून मिरवणारे गौतम अदाणी आहेत. परंतु, या दोघांमध्ये फरक असा की, अजिम प्रेमजी यांनी सन २०२०-२१ या वर्षात ९७१३ कोटी रुपये दान केले; तर गौतम अदाणी यांनी अवघे १३० कोटी रुपये या वर्षात दान केले. म्हणजे दान देणाऱ्या भारतीय उद्योगपतींमध्ये कंदाची आठव्या स्थानावर आहेत.    

  एवढेच नव्हे, तर, विप्रोचे अजिम प्रेमजी यांनी सन २०२०-२१ या वर्षात जे दान दिले ते देशातील इतर आठ प्रमुख उद्योग आणि उद्योगपतींनी दिलेल्या दानाच्या तीनशेपट अधिक आहे. भारतीय उद्योजक जे सरकारी म्हणजे जनतेच्या मालकीचे उद्योग खरेदी करण्यात अधिक स्पर्धा करतात, ते भारतीय जनतेच्या समस्या निवारणासाठी दान देण्यात मात्र पूर्णपणे कंजूस आहेत. अजिम प्रेमजी यांना सोडले तर दुसऱ्या क्रमांकावर एचसीएल कंपनीचे शिव नाडर यांनी १२६३ कोटी रुपये दान करून दुसरा क्रमांक मिळवला. परंतु, दुसरा क्रमांक मिळवताना सातशेपट चा फरक आहे. भारतीय उद्योजकांनी केलेले दान याप्रमाणे आहे,रिलायन्स चे मुकेश अंबानी हे दान करणाऱ्या यादीत तिसऱ्या स्थानी असले तरी त्यांनी केलेले दान अवघे ५७८ कोटी रुपये एवढेच आहे. याच यादीत चौथ्या स्थानी ३७७ कोटी रुपये दान करणारे बिर्ला आहेत. तर पाचव्या स्थानी इन्फोसिस चे सहसंस्थापक नंदन नीलकेणी यांनी १८३ कोटी रुपये दान केले. हिंदूजा उद्योगाने १६६ कोटी रुपये दान करून या यादीत सहावा क्रमांक मिळवला आहे.‌ तर, बजाज यांनी १३६ कोटी रुपये दान केले करून सातवा क्रमांक मिळवला. ज्या वेदांत ग्रुपचा फाॅक्सकाॅन प्रकल्प गुजरात ला गेल्या प्रकरणी महाराष्ट्रात राळ उठली, त्या अनिल अग्रवाल यांनी अवघे १३० कोटी रुपये दान केले. या सातव्या क्रमांकावर संयुक्तपणे गौतम अंदाज देखील येतात. त्यांनीही अवघे १३० कोटी रुपये दान केले. आठव्या स्थानावर बर्मन कुटूंब आहे, ज्यांनी ११४ कोटी रुपये दान केले.    आपण पाहीलत, जगाच्या श्रीमंतांच्या यादीत स्थान मिळविण्यासाठी स्पर्धा करणारे हे उद्योजक दान करून समाजाचे पर्यायाने देशाचे प्रश्न सोडविण्यासाठी किती मागे आहेत.     या यादीत टाटा समुहाचे नाव नसल्याने आपणांस आश्चर्य वाटले असेल; परंतु, टाटाचे टीसीएस आणि टाटा सन्स या उद्योगांनी सामाजिक कृतज्ञता निधी म्हणजे सीएस‌आर या फंडाच्या माध्यमातून अधिक पैसा दिला आहे.    तर, प्रेक्षकहो, या कंजूस उद्योगपतींना देशाने भरभरून दिले तरी त्यांनी आपले हात मात्र आखडतेच घेतले आहेत. कदाचित, त्यांना वि. दा. करंदीकर यांच्या कवितेचा भावार्थ कोणीतरी समजावून सांगण्याची गरज आहे,
    देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे;    घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे! यात असंही म्हटलं जातं की, देणाऱ्याने देत राहिले की, घेणाऱ्याची झोळी दुबळी ठरते. पण देणाऱ्याचे हात आखडते असले की त्याची दानाची झोळीच दुबळी ठरते.!

COMMENTS