Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

 मळगंगा देवी यात्रेसंदर्भात नियोजन बैठक पार

निघोज : राज्यातील जागृत देवस्थान म्हणून प्रसिद्ध असलेल्या मळगंगा देवीच्या यात्रोत्सवानिमित्त नियोजन बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीत यात्रेतील विविध धार्मिक, सांस्कृतिक व प्रशासकीय कार्यक्रमांचे सविस्तर नियोजन करण्यात आले. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मळगंगा यात्रा समितीचे अध्यक्ष शिवाजी लंके होते. यावेळी वीज, आरोग्य, ग्रामपंचायत, पाटबंधारे, पोलीस तसेच राज्य परिवहन मंडळाचे अधिकारी उपस्थित होते. यात्रेच्या कार्यक्रमानुसार बुधवार (दि. १) रोजी देवीला हळद लावण्याचा कार्यक्रम होणार असून गुरुवार (दि. २) रोजी काठीची मिरवणूक काढण्यात येणार आहे. पुढे शुक्रवार (दि. १०) रोजी बगाडगाडा मिरवणूक, देवीला अंबील वर्तविणे, रात्री उशिरा छबीना व काठी मिरवणूक तसेच मध्यरात्री देवीच्या घागरीचे हेमाडपंथी बारवेत दर्शन होणार आहे. शनिवार (दि. ११) रोजी सकाळी घागर मिरवणूक, दुपारी छबीना मिरवणूक व यात्रेचे कुंडावर प्रयाण होईल. रविवार (दि. १२) रोजी कुंड यात्रा तसेच दुपारी राज्यस्तरीय कुस्तीचा आखाडा भरविण्यात येणार असून याच दिवशी रात्री लोकनाट्य तमाशाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. सोमवार (दि. १३) रोजी हजरत शहा मदार कादरी यांचा उरूस तर मंगळवार (दि. १४) रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती कार्यक्रम होणार आहे.  बैठकीत ग्रामस्थांनी विविध सूचना मांडल्या. यात्रेचे नियोजन सुरळीत पार पडावे यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करण्याचे ठरविण्यात आले.

मोबदला दिल्यानंतरच महामार्गाचे काम करा; शिरूर-बेल्हे महामार्गाबाबत उच्च न्यायालयाचे आदेश
बेल्हे-शिरूर रस्ता अरुंद; निघोज-जवळा परिसरात संताप
मळगंगा देवीच्या यात्रोत्सवास प्रारंभ;शेकडो महिलांची उपस्थिती;  भक्तिमय वातावरणात जल्लोष

निघोज : राज्यातील जागृत देवस्थान म्हणून प्रसिद्ध असलेल्या मळगंगा देवीच्या यात्रोत्सवानिमित्त नियोजन बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीत यात्रेतील विविध धार्मिक, सांस्कृतिक व प्रशासकीय कार्यक्रमांचे सविस्तर नियोजन करण्यात आले.

बैठकीच्या अध्यक्षस्थानी मळगंगा यात्रा समितीचे अध्यक्ष शिवाजी लंके होते. यावेळी वीज, आरोग्य, ग्रामपंचायत, पाटबंधारे, पोलीस तसेच राज्य परिवहन मंडळाचे अधिकारी उपस्थित होते.

यात्रेच्या कार्यक्रमानुसार बुधवार (दि. १) रोजी देवीला हळद लावण्याचा कार्यक्रम होणार असून गुरुवार (दि. २) रोजी काठीची मिरवणूक काढण्यात येणार आहे. पुढे शुक्रवार (दि. १०) रोजी बगाडगाडा मिरवणूक, देवीला अंबील वर्तविणे, रात्री उशिरा छबीना व काठी मिरवणूक तसेच मध्यरात्री देवीच्या घागरीचे हेमाडपंथी बारवेत दर्शन होणार आहे.

शनिवार (दि. ११) रोजी सकाळी घागर मिरवणूक, दुपारी छबीना मिरवणूक व यात्रेचे कुंडावर प्रयाण होईल. रविवार (दि. १२) रोजी कुंड यात्रा तसेच दुपारी राज्यस्तरीय कुस्तीचा आखाडा भरविण्यात येणार असून याच दिवशी रात्री लोकनाट्य तमाशाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. सोमवार (दि. १३) रोजी हजरत शहा मदार कादरी यांचा उरूस तर मंगळवार (दि. १४) रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती कार्यक्रम होणार आहे.

 बैठकीत ग्रामस्थांनी विविध सूचना मांडल्या. यात्रेचे नियोजन सुरळीत पार पडावे यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करण्याचे ठरविण्यात आले.

COMMENTS