Homeताज्या बातम्या

महाविद्यालयात गेल्यानंतर 17 वर्षीय विद्यार्थी बेपत्ता; अपहरणाचा संशय, कंधार पोलिसांकडून तपास सुरू

नांदेड : कंधार तालुक्यातील घोडज येथील 17 वर्षीय विद्यार्थी शंकर संतोष टेकाळे हा गेल्या आठ दिवसांपासून बेपत्ता असून, अज्ञात व्यक्तीने त्याला फूस ल

रस्ता मंजूर, निधी मंजूर; काम कधी सुरू होणार? प्रा. सनी वाघमारे यांचा प्रशासनाला संतप्त सवाल
अखेर ‘सेल्फी विथ रोहित्र-हॅशटॅग अजितदादा’ आंदोलनाला यश; तुळजाई चौकातील धोकादायक रोहित्र स्थलांतरित
नीट प्रकरणावरून मुंबईत २६ जुलैला मोर्चाची हाक; विद्यार्थी-पालकांनी सहभागी होण्याचे ठाकरे बंधूंचे आवाहन

नांदेड : कंधार तालुक्यातील घोडज येथील 17 वर्षीय विद्यार्थी शंकर संतोष टेकाळे हा गेल्या आठ दिवसांपासून बेपत्ता असून, अज्ञात व्यक्तीने त्याला फूस लावून पळवून नेल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. या प्रकरणी कंधार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून विविध अंगांनी तपास सुरू आहे.

शंकर टेकाळे हा कंधार येथील मनोविकास विद्यालयात इयत्ता बारावीचा विद्यार्थी आहे. दि. 29 जुलै 2026 रोजी सकाळी सुमारे 8 वाजता तो नेहमीप्रमाणे महाविद्यालयात जात असल्याचे सांगून घरातून बाहेर पडला. मात्र सायंकाळपर्यंत तो घरी परतला नाही. सायंकाळी सुमारे 5.30 वाजता त्याचे मामा गणेश बाबाराव लाडेकर यांनी त्याच्याशी मोबाईलवर संपर्क साधून बेकरीतून काही खाऊ घेऊन येण्यास सांगितले. त्यावेळी शंकरने येताना घेऊन येतो, असे सांगितले. त्यानंतर त्याचा मोबाईल बंद लागला आणि त्याच्याशी कोणताही संपर्क होऊ शकला नाही. शंकर घरी न परतल्याने कुटुंबीयांनी कंधार शहरासह नातेवाईकांकडे आणि इतर ठिकाणी शोध घेतला. मात्र त्याचा कोणताही ठावठिकाणा न लागल्याने कंधार पोलीस ठाण्यात सुरुवातीला बेपत्ता असल्याची नोंद करण्यात आली. त्यानंतर शंकरचे शाळा सोडल्याचा दाखला (टी.सी.) व आधार कार्ड सादर केल्यानंतर त्याचे अल्पवयीन असल्याचे स्पष्ट झाले. याप्रकरणी शंकरची आई सुवर्णा संतोष टेकाळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणासाठी मुलाला फूस लावून पळवून नेल्याचा संशय व्यक्त करण्यात आला असून, संबंधितांविरुद्ध कायदेशीर कारवाईची मागणी करण्यात आली आहे. या घटनेमुळे घोडज परिसरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून, मुलाचा लवकरात लवकर शोध घेण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक अरविंद घोडके यांच्या मार्गदर्शनाखाली कंधार पोलीस करीत आहेत.

COMMENTS