Homeताज्या बातम्या

बीडमध्ये ’आरक्षण बचाव, वर्गीकरण हटाव’ परिसंवाद संपन्नआरक्षणाच्या वर्गीकरणाविरोधात एकजुटीचे आवाहन

अनुसूचित जाती (एससी) आरक्षणाचे वर्गीकरण करून आरक्षण कमकुवत करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप करत त्याविरोधात समाजबांधवांनी एकत्रितपणे संघर्ष उभा

अवकाळी चा फटका मिरची व्यापारांना, सुकवण्यासाठी टाकलेली मिरची पावसामुळे खराब
कोपरगावात रविवारी चैत्रोत्सवाचे आयोजन
गावपासून राज्याच्या राजकारणापर्यंतचा ज्ञानी नेता गमावला : आ. राजळे



अनुसूचित जाती (एससी) आरक्षणाचे वर्गीकरण करून आरक्षण कमकुवत करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप करत त्याविरोधात समाजबांधवांनी एकत्रितपणे संघर्ष उभारण्याची गरज असल्याचे मत विविध वक्त्यांनी व्यक्त केले. अनुसूचित जातीचे कर्मचारी, सेवानिवृत्त कर्मचारी, अधिकारी, विविध सामाजिक संघटना तसेच युवक व महिला आघाडीच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ’आरक्षण बचाव, वर्गीकरण हटाव’ या विषयावरील परिसंवाद शनिवारी (5 जुलै) सायंकाळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, बीड येथे उत्साहात पार पडला.
परिसंवादात राज्यातील विविध सामाजिक संघटनांशी संबंधित मान्यवरांनी मार्गदर्शन करत आरक्षणाच्या प्रश्नावर समाजाने संघटित राहण्याचे आवाहन केले. प्रदेश सचिव तथा राज्य प्रवक्ते, राष्ट्रीय चर्मकार महासंघ रोहिदास बन्सोडे यांनी, आरक्षणाचे वर्गीकरण करून बहुजन समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न होत आहे. हा डाव हाणून पाडण्यासाठी सर्व उपजातींनी एकत्र येऊन संघर्ष केला पाहिजे, असे मत व्यक्त केले. पुरोगामी विचार मंच महाराष्ट्राचे अध्यक्ष व एससी-एसटी आरक्षण बचाव समितीचे संयोजक बी. बी. घोडे (सर) सादोळकर यांनी राज्यभर सुरू असलेल्या आंदोलनाची भूमिका स्पष्ट करत हक्काचे आरक्षण कायम ठेवण्यासाठी व्यापक जनआंदोलन उभारण्याची गरज अधोरेखित केली. सत्यशोधक महासंघ महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष लक्ष्मण शिंदे यांनी, आरक्षण संपवण्याचे कारस्थान सामाजिक समतेला बाधा आणणारे आहे. सत्यशोधक विचारांच्या मार्गावर चालत हा लढा जिंकावा लागेल, असे प्रतिपादन केले. यावेळी राजू जोगदंड, सतीश कसबे, सुभाष गायकवाड, इंजि. नवनाथ जगताप, बाबुराव गालफाडे, डॉ. भारती फुलेकर, देवेंद्र ढाका, गुलाब भोले, उमाजी वाघमारे, सुनील बळवंते यांच्यासह सामाजिक व राजकीय क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते. परिसंवादाच्या शेवटी उपस्थितांनी आरक्षणाच्या वर्गीकरणाला विरोध कायम ठेवत भविष्यात व्यापक जनआंदोलन उभारण्याचा निर्धार व्यक्त केला. कार्यक्रमाला जिल्ह्यातील विविध विभागांतील कर्मचारी, सेवानिवृत्त अधिकारी, सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, महिला आणि युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी अ‍ॅड. भगवान कांडेकर, बबन वडमारे, प्रा. बाळासाहेब गव्हाणे, आशिषकुमार चव्हाण, प्रशांत वासनिक, मनोज नाना मस्के, अमोल पारवे, अ‍ॅड. सिद्धार्थ शिंदे, अ‍ॅड. अभय मगरे, अ‍ॅड. ओ. डी. गायकवाड, अ‍ॅड. अशोक वाघमारे, अ‍ॅड. तेजस वडमारे, प्रा. सनी वाघमारे, अ‍ॅड. नितीन वडमारे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. महिला आघाडीच्या कमलताई शिंदे, प्रणिताताई पवार, मंदाताई मस्के, अलका कांडेकर, विजया सोनवणे, शोभाताई मगरे, मीनाक्षी मस्के, अरुणाताई आठवले, अनिता डोंगरे, मायाताई मिसळे आणि रेशमाताई जोगदंड यांनीही सक्रिय सहभाग नोंदवला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक, सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन संयोजन समितीच्या वतीने करण्यात आले. आयोजनाबद्दल जिल्हाभरातून आयोजकांचे कौतुक करण्यात आले.

COMMENTS