Homeताज्या बातम्याशहरं

संशोधनाच्या माध्यमातून सामाजिक वास्तवता अभ्यासने गरजेचे 

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आंतरशाखीय विद्याशाखेचे डीन डॉ. संजीव सोनावणे यांचे प्रतिपादन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आंतरशाख

आमदार लंकेच्या उपोषणाच्या समर्थनार्थ पाथर्डीत रास्ता रोको
कोपरगावच्या ग्रामीण रुग्णालयासाठी एच.आर.सीटी. मशिन उपलब्ध करुन द्यावे : कोल्हे
श्री सप्तशृंगी पालखी सोहळ्याचे व रामकथेचे आयोजन

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आंतरशाखीय विद्याशाखेचे डीन डॉ. संजीव सोनावणे यांचे प्रतिपादन

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आंतरशाखीय विद्याशाखेचे डीन डॉ. संजीव सोनावणे यांनी नुकतीच सी.एस.आर.डी- समाजकार्य व संशोधन संस्थेस भेट दिली. ग्रामीण भागातील अग्रगण्य महाविद्यालय म्हणून ओळख असलेल्या बीपीएचई सोसायटीचे सीएसआरडी समाजकार्य महाविद्यालयाच्या विविध क्षेत्रात राबविण्यात येत असलेल्या उपक्रमांची माहिती त्यांनी घेतली. यावेळी त्यांच्यासोबत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आजीवन शिक्षण व विस्तार विभागाचे प्रमुख डॉ. धनंजय लोखंडे, नाशिक येथील एनडीव्हीपी समाजकार्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.विलासकुमार देशमुख उपस्थित होते. यावेळी सीएसआरडीचे संचालक डॉ.सुरेश पठारे यांच्यासह महाविद्यालयाचे प्राध्यापक व कर्मचारी उपस्थित होते.

सीएसआरडी संस्थेचे संचालक डॉ. सुरेश पठारे म्हणाले कि, ग्रामीण भागाचा अभ्यास करणे हा सीएसआरडी या संस्थेचा मुख्य केंद्रबिंदू आहे, त्यामुळे समाजकार्य विषयातील प्राध्यापक, संशोधक यांना संशोधनाची दिशा मिळण्यासाठी सीएसआरडीच्या माध्यमातून नियमितपणे विविध उपक्रम राबविण्यात येतात. ग्रामीण भागातील संशोधनास चालना मिळण्यासाठी संशोधन केद्राची आवश्यकता असल्याचे त्यांनी नमूद केले.  

यावेळी डॉ. संजीव सोनावणे यांनी उपस्थितासोबत संवाद साधला. ते म्हणाले कि, संशोधकांनी सामाजिक प्रश्नाबाबत अधिक गंभीर होण्याची आवश्यकता आहे. त्याचबरोबर संशोधनाच्या माध्यमातून प्रभावी धोरण व समाजउपयोगी कायद्यांची निर्मिती करण्यासाठी प्रयत्न होणे अपेक्षित आहे. त्यादृष्टीने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या माध्यामतून संशोधनास प्रोत्साहन देण्यासाठी घेण्यात येत असलेल्या प्रयत्नांची माहिती त्यांनी उपस्थितांना दिली. त्यांनी पुढे सांगितले कि, सामाजिक संशोधन हि निरंतर चालणारी प्रक्रिया असून संशोधनामध्ये सातत्याने भर पडत असते त्यामुळे सामाजिक संशोधन करणाऱ्या संशोधकांनी प्रथम समाजाचे विविध पैलू समजावून घेणे गरजेचे आहे. सामाजिक संशोधन करीत असताना नियोजनपूर्वक संशोधनाची सुरवात केल्यास आपणास योग्य ते निष्कर्ष मिळू शकतात. त्यासाठी प्रत्येक संशोधकाने संशोधन पद्धतीचा अभ्यास योग्य त्या शास्त्रीय रीतीने करायला हवा असे त्यांनी जाणीवपूर्वक सांगितले. संशोधकाने ग्रामीण भागाची चिकित्सा करून आपण संशोधन पद्धतीचा विकास करू शकतो. नवीन ज्ञान मिळवून त्याची चिकित्सा करणे हे सामाजिक संशोधकाचे कर्तव्य आहे असे त्यांनी सांगितले.  

COMMENTS