Homeताज्या बातम्यादेश

बोगद्यातील कामगार आज बाहेर येण्याची शक्यता

नवी दिल्ली ः उत्तराखंड राज्यातील उत्तरकाशीच्या सिक्क्यारा बोगद्यात दरड कोसळल्यामुळे तिथे काम करणारे 41 कामगार गेल्या 11 दिवसांपासून बोगद्यात अडकल

संगमनेरात थॅलेसेमिया डे केअर सेंटरचे उद्घाटन
मोकळ्या जागेवर कर लावण्याच्या ठरावाचा तात्काळ अहवाल द्या; कराड पालिकेच्या मुख्याधिकार्‍यांना आयुक्तांचा दणका
काँग्रेस नेते राजा पटेरिया यांना अटक

नवी दिल्ली ः उत्तराखंड राज्यातील उत्तरकाशीच्या सिक्क्यारा बोगद्यात दरड कोसळल्यामुळे तिथे काम करणारे 41 कामगार गेल्या 11 दिवसांपासून बोगद्यात अडकले आहेत. त्यांच्या सुटकेसाठी शर्थीचे प्रयत्न करण्यात येत असले तरी, अजूनही या कामगारांची सुटका करण्यात अजूनही यश मिळालेले नाही.
बोगद्यात रात्रंदिवस पथके बचावकार्य करत आहेत. त्याचबरोबर बोगद्यात ऑगर मशीनच्या सहाय्याने 39 मीटरपर्यंत खोदकाम करण्यात आले आहे. एकूण 57 ते 60 मीटर खोदकाम करायचे आहे. अधिकार्‍यांचे म्हणणे आहे की जर सर्व काही ठीक झाले तर बचाव कार्य बुधवारी उशीरापर्यंत संपू शकते, असे झाले तर, आज गुरूवारी कामगार बोगद्यातून बाहेर येवू शकतात. सध्या मजुरांना बाहेर काढण्यासाठी ड्रिलिंग सुरु करण्यात आले आहे. या मजुरांना बोगद्यातून बाहेर काढण्यासाठी सरकारकडून पाच प्लान तयार केले आहेत. या प्लानवर सरकारचे काम सुरु आहे. सरकारने मजुरांचा जीव वाचविण्यासाठी आंतरराष्ट्रीय टनल एक्सपर्ट अल्बर्टो ड्रिक्स यांना मदतीसाठी बोलावलं आहे. रस्ते वाहतूक आणि महामार्ग सचिव अनुराग जैन यांनी सांगितले की, ’बोगद्यातून मजुरांना बाहेर काढण्यासाठी व्हर्टिकल ड्रिलिंग सुरु केली आहे. तो सर्वात चांगला पर्याय आहे. आम्हाला विश्‍वास आहे की, या मजुरांना पुढील अडीच दिवसांत बाहेर काढू. सरकार अडकलेल्या मजुरांना बाहेर काढण्यासाठी 5 प्लानवर काम करत आहे. सुरुवातीला आडव्या पद्धतीने ड्रिलिंग सुरु होते, पण त्याला खूप वेळ लागत होता. आता उभ्या पद्धतीने ड्रिलिंग करण्याचे काम सुरु आहे. बोगद्यात अडकलेल्या मजुरांना बाहेर काढण्यासाठी सरकारच्या विविध एजन्सी काम करत आहेत. सरकार कामगारांचे मनोबल वाढविण्यासाठी सदैव त्यांच्या संपर्कात राहत आहे. पाईपलाइनमार्फत कामगारांपर्यंत गरजेच्या वस्तू पोहोचविण्यात आल्या आहेत.

COMMENTS