Homeताज्या बातम्या

देशात राष्ट्रीय तपास यंत्रणांचे छापे; ड्रोनद्वारे शस्त्र तस्करी प्रकरणी १२ ठिकाणी शोधमोहीम

नवी दिल्ली : देशाच्या सुरक्षेला धोका निर्माण करणाऱ्या कथित दहशतवादी जाळ्याविरोधात राष्ट्रीय तपास संस्थेने (NIA) मोठी कारवाई हाती घेतली आहे. विविध

भारत नेहमीच शांततेच्या भूमिकेवर ठाम; पंतप्रधान मोदी-झेलेन्स्की भेटीत द्विपक्षीय सहकार्याला नवी चालना
NEET प्रकरणावरून शिक्षणमंत्र्यांनी राजीनामा द्यावा: खा. राहुल गांधी
कोणत्याही स्वरूपातील दहशतवाद मान्य नाही; भारताने संयुक्त राष्ट्रात पाकिस्तानला सुनावले
anti drone system made by godrej and other companies for security india  home ministry exhibition | Anti Drone System : सीमेपलीकडून होणाऱ्या ड्रग्ज  आणि हत्यारांच्या तस्करीला बसणार आळा, भारत उचलणार मोठे पाऊल

नवी दिल्ली : देशाच्या सुरक्षेला धोका निर्माण करणाऱ्या कथित दहशतवादी जाळ्याविरोधात राष्ट्रीय तपास संस्थेने (NIA) मोठी कारवाई हाती घेतली आहे. विविध राज्यांतील १२ ठिकाणांवर एकाच वेळी शोधमोहीम राबविण्यात आली. ही कारवाई ड्रोनच्या माध्यमातून भारतात शस्त्रे, दारूगोळा आणि स्फोटके पाठविल्याच्या आरोपांशी संबंधित प्रकरणात करण्यात आली आहे.

तपास यंत्रणांच्या माहितीनुसार, पाकिस्तानशी संबंधित संशयित घटक आणि त्यांच्या भारतातील सहकाऱ्यांवर लक्ष केंद्रित करून उत्तर प्रदेश, राजस्थान, बिहार आणि महाराष्ट्रातील विविध ठिकाणी छापे टाकण्यात आले. या मोहिमेत उत्तर प्रदेशातील पाच, राजस्थानमधील दोन, बिहारमधील दोन आणि महाराष्ट्रातील तीन ठिकाणांचा समावेश आहे. शोधमोहीमेदरम्यान विविध डिजिटल साधने, कागदपत्रे तसेच इतर संशयास्पद साहित्याची तपासणी करण्यात येत आहे. या साहित्याच्या आधारे संबंधित जाळ्याच्या कार्यपद्धतीबाबत अधिक माहिती मिळण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

प्राथमिक तपासात भारत-पाकिस्तान सीमेलगतच्या भागातून मानवविरहित उड्डाण साधनांचा (ड्रोन) वापर करून शस्त्रे व स्फोटक सामग्री देशात पोहोचविण्याचा प्रयत्न झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. ही सामग्री देशातील विविध भागांत घातपाताच्या कारवायांसाठी वापरण्याचा कट रचण्यात आल्याची माहिती तपास यंत्रणांकडून समोर आली आहे. नागरिकांच्या जीविताला आणि मालमत्तेला धोका निर्माण करून भीतीचे वातावरण निर्माण करणे हा या कटामागील उद्देश असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

हरियाणात दोन पाकिस्तानी नागरिकांसह नऊ जणांवर आरोपपत्र हरियाणातील सिरसा येथील महिला पोलीस ठाण्यावर झालेल्या हातबाँब हल्ला प्रकरणातही राष्ट्रीय तपास संस्थेने महत्त्वाची कारवाई केली आहे. या प्रकरणात दोन पाकिस्तानी नागरिकांसह नऊ आरोपींविरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. तपासादरम्यान भारतातील पोलीस आस्थापनांना लक्ष्य करण्यासाठी कट रचण्यात आल्याचे निष्पन्न झाल्याचा दावा करण्यात आला आहे. आरोपींविरोधात बेकायदेशीर कारवाया प्रतिबंधक कायदा (UAPA), भारतीय न्याय संहिता तसेच स्फोटक पदार्थ कायद्यांतर्गत गुन्हे नोंदविण्यात आले आहेत.

COMMENTS