Homeताज्या बातम्यामुंबई - ठाणे

नारीशक्ती कदापी माफ करणार नाही; महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची विरोधकांवर टीका; लोकसभेत महिला आरक्षणासह तीन विधेयके सादर

नवी दिल्ली : महिला आरक्षण विधेयकातील सुधारणांच्या पार्श्‍वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी स्पष्ट शब्दांत भूमिका मांडत विरोधकांना सूच

‘महायुतीत बॉस कोण’ फडणवीसांनी गेम कसा फिरवला शिंदेंची प्रतिष्ठा आणि दिल्लीत लागलेला ब्रेक
ममतादीदींचे साम्राज्य खालसा !
बंगालमध्ये विजयाचा जल्लोष ठरतोय रक्तरंजित राजकीय संघर्षात 3 कार्यकर्त्यांचा बळी गेल्याने तणाव वाढला
जिसने विरोध किया, महिलाओं ने उसका बुरा हाल किया', परिसीमन से लेकर महिला  आरक्षण तक, PM मोदी की विपक्ष को खरी-खरी


नवी दिल्ली :
महिला आरक्षण विधेयकातील सुधारणांच्या पार्श्‍वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी स्पष्ट शब्दांत भूमिका मांडत विरोधकांना सूचक इशारा दिला. महिला आरक्षण विधेयकाला विरोध केल्यास नारीशक्ती तुम्हाला कदापी माफ करणार नाही, असा सूचक इशारा पंतप्रधान मोदी यांनी विरोधकांना दिला.
पंतप्रधान मोदी लोकसभेत बोलतांना पुढे म्हणाले की, देशाच्या राजकीय इतिहासाकडे पाहिल्यास महिलांच्या हक्कांना विरोध करणार्‍यांना जनतेने कधीही माफ केलेले नाही. निवडणुकांच्या काळात अशा विरोधकांना मोठा राजकीय फटका बसल्याची उदाहरणे वारंवार दिसून आली आहेत. त्यामुळे महिलांच्या अधिकारांबाबत नकारात्मक भूमिका घेणार्‍यांनी याचे गंभीर परिणाम लक्षात घ्यावेत, असा अप्रत्यक्ष इशाराही त्यांनी दिला. महिला आरक्षणाचा प्रश्‍न हा केवळ राजकीय विषय नसून सामाजिक न्यायाशी निगडित असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. या विषयात राजकारणाचा अतिरेक टाळण्याची गरज असल्याचे सांगताना, केवळ स्वार्थासाठी या मुद्द्याचा वापर केल्यास त्याचे नुकसान संबंधितांना भोगावे लागेल, असे त्यांनी स्पष्ट केले. पुढे बोलताना त्यांनी नमूद केले की, महिलांच्या सन्मान आणि अधिकारांबाबत कोणतीही चुकीची भूमिका घेतल्यास देशातील महिला मतदार त्याकडे गांभीर्याने पाहतात. अशा चुकीच्या हेतूंना त्या कधीही माफ करत नाहीत. त्यामुळे सर्व पक्षांनी या विषयाकडे संवेदनशीलतेने आणि जबाबदारीने पाहावे, असे आवाहन त्यांनी केले.
दरम्यान, केंद्र सरकारने संसदेत तीन महत्त्वाची विधेयके मांडताच राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. विशेष अधिवेशनाच्या प्रारंभीच ही विधेयके सादर झाल्याने सत्ताधारी व विरोधी पक्ष आमनेसामने आले असून सभागृहात चांगलच खडाजंगी झाली. नारीशक्ती वंदन कायद्यावर गुरूवारी लोकसभेत चर्चा पार पडल्यानंतर शुक्रवारी या विधेयकावर मतदान होणार आहे. कायदा मंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी संविधान (131 वी दुरुस्ती) विधेयक 2026 तसेच परिसीमन विधेयक 2026 सादर करण्याचा प्रस्ताव मांडला. याचबरोबर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केंद्रशासित प्रदेश कायदे (दुरुस्ती) विधेयक 2026 सभागृहात मांडले. या तिन्ही विधेयकांमुळे देशाच्या निवडणूक पद्धतीत तसेच प्रतिनिधित्वाच्या रचनेत बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. विधेयके सादर होताच विरोधी पक्षांनी आक्षेप नोंदवला. काँग्रेसचे खासदार के. सी. वेणुगोपाल यांनी या तिन्ही प्रस्तावांना विरोध दर्शवत प्रक्रिया आणि हेतूंवर प्रश्‍नचिन्ह उपस्थित केले. त्यावर प्रतिक्रिया देताना अमित शाह यांनी विरोधकांवर टीका करत, चर्चेदरम्यान सरकार सर्व मुद्द्यांना ठोस उत्तर देईल, असे स्पष्ट केले. समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांनी महिला आरक्षणाला समर्थन दर्शविले असले तरी सरकारच्या घाईगडबडीवर प्रश्‍न उपस्थित केला.

आज मतदान, केंद्र सरकारची आज कसोटी
लोकसभेत सादर करण्यात आलेल्या तीन महत्त्वाच्या विधेयकांवर आज शुक्रवारी दुपारी चार वाजता मतदान होणार असल्याची माहिती लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी दिली. या मतदानापूर्वी सभागृहात सुमारे पंधरा ते अठरा तास सविस्तर चर्चा होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. दरम्यान, या विधेयकांना लोकसभेची मंजुरी मिळाल्यानंतर त्यांना पुढील प्रक्रियेसाठी राज्यसभेकडे पाठवण्यात येणार आहे. यामुळे संसदेत पुढील काही दिवस या विषयावर राजकीय घडामोडी वेग घेण्याची चिन्हे आहेत.

COMMENTS