पहिल्यांदा नगरचे 35 विद्यार्थी झळकले राज्याच्या गुणवत्ता यादीत

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पहिल्यांदा नगरचे 35 विद्यार्थी झळकले राज्याच्या गुणवत्ता यादीत

शिष्यवृत्ती परीक्षेत नगरचा फडकला झेंडा

अहमदनगर/प्रतिनिधी : मागील ऑगस्ट 2021 मध्ये झालेल्या शिष्यवृत्तीच्या परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर झाला आहे. या परीक्षेत नगर शहर व जिल्ह्यातील मिळून विक

मी कारवाईला घाबरत नाही व इतरांना उत्तर द्यायला बांधिल नाही ; खा. विखेंनी केले स्पष्टीकरण, रेमडीसीवीर इंजेक्शन प्रकरण गाजणार
होळी, धुलीवंदन व रंगपंचमी साजरी करण्यावर निर्बंध ; कोरोनामुळे प्रशासनाचा निर्णय
विहिरीचे काम करत असताना परप्रांतीय पती-पत्नीचा दुर्दैवी मृत्यू

अहमदनगर/प्रतिनिधी : मागील ऑगस्ट 2021 मध्ये झालेल्या शिष्यवृत्तीच्या परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर झाला आहे. या परीक्षेत नगर शहर व जिल्ह्यातील मिळून विक्रमी 35 संख्येने यशस्वी विद्यार्थी राज्याच्या गुणवत्ता यादीत झळकले आहेत. शिष्यवृत्ती परीक्षेत नगरचा झेंडा त्यामुळे दिमाखाने फडकला आहे. या परीक्षेत नगर जिल्ह्यातील जिल्हा परिषद आणि खासगी शाळांमधील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले. पूर्व उच्च प्राथमिक विभागाचे (पाचवी) 20 तर पूर्व माध्यमिक विभागाचे (आठवी) 15 विद्यार्थी अशा एकूण 35 विद्यार्थ्यांनी राज्याच्या गुणवत्ता यादीत स्थान मिळवले आहे.
या निकालात पूर्व उच्च प्राथमिक विभागामध्ये साईराज अशोक कडूस हा राज्यात तिसरा व जिल्ह्यात प्रथम आला असून पूर्व माध्यमिक विभागामध्ये ग्रामीण भागात उमर कलिम शेख व साक्षी सुदाम शिंदे राज्यात अनुक्रमे पहिल्या आणि दुसरी स्थानी आहेत. त्याचसोबत पूर्व माध्यमिक विभागाची प्राजक्ता दीपक चव्हाण ही सीबीएसई-आयसीएसई विभागातून राज्यात पहिल्या स्थानी आहे. या यशवंत व गुणवंत विद्यार्थ्यांनी नगरचा लौकिक वाढवला आहे व राज्याच्या गुणवत्ता यादीत झळकून नगरचा झेंडा उंचावला आहे.
12 ऑगस्ट 2021 ला शिष्यवृत्तीची परीक्षा झाली होती. या परीक्षेचा अंतरिक निकाल हा 24 नोव्हेंर 2021 ला प्रसिध्द झाला होता. शुक्रवार (दि. 7) रोजी रात्री उशीरा राज्यस्तरीय याद्या आणि अंतिम निकाल जाहीर झाला आहे. यात पूर्व उच्च प्राथमिकचे ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या शाळेतील 4, खासगी शाळेतील 4, शहरी भागातील खासगी शाळेतील 8 आणि सीबीएसई-आयसीएसई विभागातून खासगी शाळेतील 4 अशा 20 विद्यार्थ्यांचा तर पूर्व माध्यमिकमधील ग्रामीण भागातील खासगी शाळेतील 8, शहरी भागातील खासगी शाळेतील 4 आणि सीबीएसई-आयसीएसई विभागातून खासगी शाळेतील 3 अशा 15 विद्यार्थ्यांनी राज्याच्या यादीत स्थान पटकावले आहे. यशस्वी विद्यार्थ्यांमध्ये (पूर्व उच्च प्राथमिक शहरी) साईराज कडूस-(पारनेर पब्लिक स्कूल, राज्य गुणवत्ता यादी क्रमांक 1), अर्णव गिते-(मातोश्री विद्यालय मालपाणी संगमनेर, राज्य गुणवत्ता यादी क्रमांक 2), मीरा गडाख-(डी.जी. सराफ विद्यालय संगमनेर, राज्य गुणवत्ता यादी क्रमांक 3), सोई घुगे-(भाऊसाहेब गुंजाळ पाटील सह्याद्री विद्यालय संगमनेर, राज्य गुणवत्ता यादी क्रमांक 4), आर्यन देवकर-(रेसिडेन्शिअल हायस्कूल नगर, राज्य गुणवत्ता यादी क्रमांक 5), तेजस्विनी सुरवसे-(एस.एन. कन्या मंदिर कर्जत, राज्य गुणवत्ता यादी क्रमांक 6), वेदिका गाडेकर-(एस.के. सोमय्या विद्यालय श्रीरामपूर, राज्य गुणवत्ता यादी क्रमांक 7) आणि कार्तिकेय दरवडे-(रेसिडेन्शिल हायस्कूल नगर, राज्य गुणवत्ता यादी क्रमांक 8) यांचा समावेश आहे. तसेच पूर्व उच्च प्राथमिक ग्रामीण विभागामध्ये पृथ्वीराज पिंपरे-(लाटेवस्ती शाळा जामखेड, राज्य गुणवत्ता यादी क्रमांक 5), श्रेया थोपटे-(वृंदावन स्कूल, पोखरी फाटा संगमनेर, राज्य गुणवत्ता यादी क्रमांक 9), सुर्वेश बेलोटे-(पिंपरी जलसेन पारनेर, राज्य गुणवत्ता यादी क्रमांक 10), कार्तिकी सोनवणे-(सावित्रीबाई फुले विद्यालय राहुरी, राज्य गुणवत्ता यादी क्रमांक 10), तनिष्का चौरे-(डॉ. विखे पाटील विद्यालय लोणी, राज्य गुणवत्ता यादी क्रमांक 10), अथर्व जगताप-(भारत हायस्कूल घारगाव, राज्य गुणवत्ता यादी क्रमांक 10), तन्वी सोनवणे आणि उत्कर्षा शेंडे (दोघी जि. प. शाळा- पिंपरी जलसेन, राज्य गुणवत्ता यादी क्रमांक 10) यांचा सामवेश आहे. तर सीबीएसई-आयसीएसई विभागात अनुपम नजन (सेंट मायकेल स्कूल नगर, राज्य गुणवत्ता यादी क्रमांक 1), नामिश अग्रवाल (श्रीरामपूर, राज्य गुणवत्ता यादी क्रमांक 2), साई सुपेकर-(कर्जत, राज्य गुणवत्ता यादी क्रमांक 3) आणि आर्था धापटे-(शिरसगाव, श्रीरामपूर) राज्य गुणवत्ता यादी क्रमांक 4 यांचा समावेश आहे. पूर्व माध्यमिक विभागातील शहरी यशस्वी विद्यार्थी असे – भैरवी भांबरे-(गांधी कन्या मंदिर नेवासा, राज्य गुणवत्ता यादी क्रमांक 1), संस्कार गिरवले (नगर, राज्य गुणवत्ता यादी क्रमांक 2), अथर्व क्षीरसागर- (गांधी विद्यालय कर्जत, राज्य गुणवत्ता यादी क्रमांक 3) आणि संकेत नाबगे (नगर, राज्य गुणवत्ता यादी क्रमांक 4) यांचा समावेश असून पूर्व माध्यमिक विभागातील ग्रामीण भागातून उमर शेख- (मिरजगाव कर्जत, राज्य गुणवत्ता यादी क्रमांक 1), साक्षी शिंदे- (जवळा जामखेड, राज्य गुणवत्ता यादी क्रमांक 2), श्रृतिका दिघे- (लोणी, राज्य गुणवत्ता यादी क्रमांक 3), सुजित धनवडे (कोल्हार, राज्य गुणवत्ता यादी क्रमांक 4), मिताली पोफळे-(जवळा जामखेड, राज्य गुणवत्ता यादी क्रमांक 5), प्रणव विखे आणि संजीवनी अहिरे (दोघे विखे पाटील विद्यालय लोणी, राज्य गुणवत्ता यादी क्रमांक 6 आणि 7), अंगद खंडागळे ड्ढ(करजगाव विद्यालय नेवासा, राज्य गुणवत्ता यादी क्रमांक 8) तसेच पूर्व माध्यमिक सीबीएसई- आयसीएसई विभागात प्राजक्ता चव्हाण (विद्यानिकेत श्रीरामपूर, राज्य गुणवत्ता यादी क्रमांक 1), संस्कृती गोडगे (टाकळी ढोकेश्‍वर, राज्य गुणवत्ता यादी क्रमांक 2) आणि रोशनी पाटोळे (कर्जत, राज्य गुणवत्ता यादी क्रमांक 3) यांचा समावेश आहे.

COMMENTS