Homeताज्या बातम्यामनोरंजन

राहुल वैद्य-दिशा परमार लवकरच होणार आई-बाबा

मुंबई प्रतिनिधी - हिंदी मनोरंजन विश्वातीक 'बड़े अच्छे लगते हैं २' या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री दिशा परमार आणि तिचा पती राहुल वैद्य

हळदीच्या कार्यक्रमात नाचण्यावरून महिलेला मारहाण | LOKNews24
विखे व श्री गणेश कारखान्याच्या कामगारांना तीन हप्त्यात थकीत देयके द्या : उच्च न्यायालय
तीन चाकांची भन्नाट स्कूटर

मुंबई प्रतिनिधी – हिंदी मनोरंजन विश्वातीक ‘बड़े अच्छे लगते हैं २’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री दिशा परमार आणि तिचा पती राहुल वैद्य यांनी नुकतीच एक आनंदाची बातमी आपल्या चाहत्यांना दिली. • दिशा प्रेग्नंट असून असून लवकरच दिशा आणि राहुल आई- बाबा होणार आहेत. सोशल मीडियावर दिशा आणि राहुल यांनी एक खास फोटो शेयर केला आहे. ही आनंदाची बातमी दिल्यानंतर दोघांवरही शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.राहुल आणि दिशाने सोशल मीडियावर त काही फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये दिशा आपलं बेबी बंप दाखवत आहे. दोघांनीही ब्लॅक कलर निवकून मॅचिंग केलं आहे. दोघेही क्युट पोज देत असून त्यांच्या हातात ‘आई आणि बाबा’ लिहिलेली पती आहे. तर सोबत हॉस्पिटल मधील सोनोग्राफीतील अल्ट्रासाऊंड फोटोही त्यांनी शेयर केला आहे. सोबत व्हिडिओ आहे, ज्यामध्ये सोनोग्राफी होताना दिसत आहे.दिशा आणि राहुल यांनी ही पोस्ट शेअर केल्यानंतर त्यांच्या चाहत्यांनी आणि सहकलाकारांनी त्यांच्यावर अभिनंदनाचा आणि शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. राहुल आणि दिशा यांनी १६ जुलै २०२१ मध्ये लग्न केलं होतं. राहुलनं दिशाला बिग बॉस १४ मध्ये प्रपोज केलं होतं. त्यानंतर दोघं एकमेकांना डेट करत होते. मग त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला आणि आता ते आई बाबा होणार आहेत. लग्नानंतर एका चाहत्यानं विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना राहुलनं त्याला मुलगी व्हावी अशी इच्छा व्यक्त केली होती. हे सांगताना मुली बेस्ट असतात असं त्यानं म्हटलं होतं.

COMMENTS