Nanded : गुरफळीचे दुग्ध व्यावसायिक करतायेत नदीतून प्रवास (Video)

Homeव्हिडीओ

Nanded : गुरफळीचे दुग्ध व्यावसायिक करतायेत नदीतून प्रवास (Video)

       मुसळधार पावसामुळे नदीला पूर आल्याने तालुक्यातील २५ गावांचा संपर्क तुटला आहे . रस्ते वाहतूक ठप्प झाल्याने शहरात दूध पुरवठा करणाऱ्या दुग्ध व्याव

धडक पाहणीने उघड केला ‘वाळू घोटाळा’; अधिकार्‍यांवर कारवाईचे संकेत!
मद्य विक्री अनुज्ञप्त्या बंद ठेवण्याचे आदेश जारी
बालविवाह प्रतिबंध कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी पीपल्स हायस्कूलमध्ये जनजागृती कार्यक्रम

       मुसळधार पावसामुळे नदीला पूर आल्याने तालुक्यातील २५ गावांचा संपर्क तुटला आहे . रस्ते वाहतूक ठप्प झाल्याने शहरात दूध पुरवठा करणाऱ्या दुग्ध व्यावसायिकांची अडचण झाली आहे . मात्र , गुरफळी येथील युवक रोज पोहत नदी पार करत दूध पुरवठा करत आहेत . गुरफळी येथील नदीला पूर येऊन गावाला पाण्याचा वेढा पडत असल्याने या गावाचे पुनर्वसन झाले आहे . परंतु काही लोकांची शेती नदीपलीकडील विदर्भ शिवारात आहे .गेल्या तीन पिढ्यांपासून या गावातील शेतकरी दुग्ध व्यवसाय करतात. नदीपार करत शहरात दूध पोहोचविणाऱ्या या धाडसी युवकांचा व्हीडिओ समाजमाध्यमात ‘ व्हायरल ‘ होताच त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव झाला . मात्र , कौतुक नको , या नदीवर पूल बांधून देण्यासाठी सरकारला आवाहन करा , अशी विनंती गावकऱ्यांनी केली आहे .

COMMENTS