कृषी विभागाच्या या योजनांचा लाभ घेण्यासाठी महा-डीबीटी संकेतस्थळावर अर्ज करावेत.

Homeमहाराष्ट्रकृषी

कृषी विभागाच्या या योजनांचा लाभ घेण्यासाठी महा-डीबीटी संकेतस्थळावर अर्ज करावेत.

शेतकऱ्यांना विविध योजनांचा लाभ देण्यासाठी नव्याने विकसित केलेल्या महाडीबीटी पोर्टल या एकात्मिक प्रणालीवर एकाच अर्जाव्दारे विविध घटकांसाठी अर्ज करणे त

विश्‍वास साखर कारखान्याकडून प्रतिटन तीन हजार रुपये वर्ग
 निफाडच्या उगावमध्ये पावसाने 2 एकर द्राक्षबाग जमीनदोस्त  
सागरेश्‍वरच्या डोंगर परिसरात बिबट्याचे दर्शन


शेतकऱ्यांना विविध योजनांचा लाभ देण्यासाठी नव्याने विकसित केलेल्या महाडीबीटी पोर्टल या एकात्मिक प्रणालीवर एकाच अर्जाव्दारे विविध घटकांसाठी अर्ज करणे ते प्रत्यक्ष अनुदान लाभाची रक्कम डीबीटीव्दारे अर्जदारांच्या बँक खात्यावर जमा करण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. अशी माहिती उपविभागीय कृषी अधिकारी दिलीप देवरे व तालुका कृषी अधिकारी बाळासाहेब व्यवहारे यांनी शासकीय प्रसिध्दी पत्रकान्वये दिली आहे. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व सर्वसाधारण प्रवर्गातील इच्छूक शेतकरी बाधवांनी कृषी यांत्रिकीकरण अंतर्गत शेतकरी गटाव्दारे भाडे तत्वावरील अवजारे बँक, ट्रॅक्टर, रोटाव्हेटर, पल्टीनांगर, मळणीयंत्र, कल्टीव्हेटर, पेरणी यंत्र, पॉवर टिलर तसेच सिंचन सुविधा अंतर्गत ठिंबक सिंचन व तुषार सिंचन, वैयक्तीक शेततळे, शेततळे अस्तरीकरण, पीव्हीसी पाईप, विद्युत पंपसंच तर फलोत्पादन घटकाअंतर्गत कांदाचाळ, शेडनेट, पॉलीहाऊस, मल्चिंग, मधुमक्षिका पालन, आळिंबी उत्पादन, फळबाग लागवड आदी घटकांचा लाभ
घेण्यासाठी आपल्या नजीकच्या महा ई-सामुदायिक सेवा केंद्रावर जाऊन https://mahadbtmahait.gov.in या संकेतस्थवर आपल्या आधार क्रमांकाव्दारे नाव नोंदणी करुन लाभ घ्यावयाच्या घटकांसाठी अर्ज दाखल करण्याचे आवाहनही उपविभागीय कृषी अधिकारी दिलीप देवरे व तालुका कृषी अधिकारी बाळासाहेब व्यवहारे यांनी केले आहे.

COMMENTS