Homeताज्या बातम्या

नांदेड पोलिसांचे ‘ऑपरेशन फ्लश आऊट’; भाग्यनगरमधील खून आणि उस्माननगरमधील दरोड्याच्या गुन्ह्यातील मुख्य फरार आरोपी जेरबंद

नांदेड : नांदेडचे पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांच्या संकल्पनेतून सुरू असलेल्या ‘ऑपरेशन फ्लश आऊट’ अंतर्गत भाग्यनगर गुन्हे शोध पथकाला (DB) मोठे यश

नांदेडमध्ये एलसीबीची धडक कारवाईतेलंगणातील तस्कर अटकेत, 1 किलो 40 ग्रॅम गांजा जप्त, महिला आरोपी फरार
नांदेडमध्ये मुदतबाह्य औषध विक्रीप्रकरणी तोष्णीवाल मेडिकल्सवर मोठी कारवाई; विना बिल आणि विना फार्मासिस्ट सुरू होता कारभार
आमदार बालाजीराव कल्याणकर यांच्या वाढदिवसानिमित्त राहुल देशपांडे यांची ‘संगीत संध्या’

नांदेड : नांदेडचे पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांच्या संकल्पनेतून सुरू असलेल्या ‘ऑपरेशन फ्लश आऊट’ अंतर्गत भाग्यनगर गुन्हे शोध पथकाला (DB) मोठे यश आले आहे. भाग्यनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खळबळजनक खून प्रकरण आणि उस्माननगर येथील दरोड्याच्या गुन्ह्यात गेल्या अनेक दिवसांपासून फरार असलेला मुख्य आरोपी सूरज सुनील कदम (वय २२, रा. विनायकनगर, नांदेड) याला पोलिसांनी परभणीतून सापळा रचून अटक केली आहे.

दि. ४ एप्रिल २०२६ रोजी भाग्यनगर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा (BNS कलम १०३(१), १०९, ३(५) सह हत्यार कायदा) दाखल झाला होता. या गुन्ह्यातील मुख्य आरोपी सूरज कदम हा तेव्हापासून पोलिसांना गुंगारा देत फरार होता. तो परभणी जिल्ह्यातील मानवत रेल्वे स्टेशन परिसरात लपून बसल्याची खात्रीशीर माहिती मिळताच, पोलीस उपनिरीक्षक नरेश वाडेवाले व त्यांच्या पथकाने खाजगी वाहनाने जाऊन मानवत परिसरात गोपनीय सापळा रचला आणि त्याला ताब्यात घेतले. १० जून २०२६ रोजी त्याला अधिकृतपणे अटक करण्यात आली.

पोलिसी खाक्या दाखवताच त्याने सन २०२४ मध्ये उस्माननगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतही एक मोठा दरोडा टाकल्याची कबुली दिली. उस्माननगर पोलीस अभिलेखानुसार तो या दरोड्याच्या गुन्ह्यातही (गु.र.नं. १९४/२०२४) गेल्या दोन वर्षांपासून फरार होता. ही धडक कारवाई पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार, अपर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील, सूरज गुरव, डीवायएसपी रामेश्वर वेंजने यांच्या मार्गदर्शनाखाली भाग्यनगरचे पोलीस निरीक्षक संतोष तांबे, पीएसआय नरेश वाडेवाले, पीएसआय विनोद देशमुख आणि सायबर सेलच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली.

COMMENTS