Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

ओबीसी आरक्षण वाचवले नाही तर, तीव्र आंदोलन उभारू

ओबीसीचे नेते दिलीप खेडकर यांचा राज्य सरकारला इशारा

पाथर्डी ः शासन कुठेतरी झुंडशाहीला नमल असल्याचे जाणवले असून ज्या तत्परतेने मराठा समाजाच्या मागण्या मान्य केल्या जावून विशेष अधिवेशन बोलवले गेले आह

ओबीसी आरक्षणामध्ये घुसखोरीचा डाव
इम्पिरिकल डाटा शिवाय आरक्षण अशक्य
ओबीसी आरक्षणावरून निवडणूक रद्द करण्याच्या राज्य सरकारच्या निर्याणाला झटका… सर्वोच्च न्यायालय म्हणाले…

पाथर्डी ः शासन कुठेतरी झुंडशाहीला नमल असल्याचे जाणवले असून ज्या तत्परतेने मराठा समाजाच्या मागण्या मान्य केल्या जावून विशेष अधिवेशन बोलवले गेले आहे.या सर्व बाबी पाहता महाराष्ट्र शासन कुठे तरी पार्षल आहे असे आम्हाला सगळ्याना वाटत असून आमच्यावर अन्याय होईल असे आम्हाला दिसत असल्याने हा आंदोलनाचा लढा आम्ही उभारला आहे असे प्रतिपादन ओबीसीचे नेते दिलीप खेडकर यांनी केले.
ते 14 फेब्रुवारी पासून कीर्तनवाडी येथे प्रल्हाद कीर्तने यांनी ओबीसी आरक्षण बचावासाठी सुरू केलेल्या आमरण उपोषणाची शासनाने दखल घ्यावी यासाठी राष्ट्रीय महामार्गावर करण्यात आलेल्या रास्तारोको प्रसंगी बोलत होते. यावेळी बाळासाहेब सानप, माणिक खेडकर,गौकुळ दौंड,ज्ञानेश्‍वर दराडे,किसन आव्हाड, महारुद्र किर्तने, नागनाथ गर्जे आदींसह ओबीसी बांधव मोठया प्रमाणावर उपस्थित होते. यावेळी आंदोलनाची दखल न घेणार्‍या प्रशासनाचा संतप्त जमावाने महामार्गावर टायर जाळत निषेध व्यक्त केला. पुढे बोलताना खेडकर यांनी म्हटले की, मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही असे महाराष्ट्रातील सगळे राजकीय नेते सातत्याने सांगत होते. त्यामूळे ओबीसी समाज मराठा समाजाला पाठींबा देत त्यांचे गावोगावी स्वागत करत होते. परंतु दुर्दैवाने आम्हाला जे सांगितले गेले होते, तसे झाले नसून ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का लागला आहे. जर शासनाने आमच्या मागण्या मान्य करून आमचे आरक्षण वाचवले नाही तर या प्रकाराचे तीव्र आंदोलन करत शासनाने घेतलेला निर्णय आम्ही त्यांना मागे घेण्यास भाग पाडू असे असे ते शेवटी म्हणाले. यावेळी गोकुळ दौंड यांनी बोलताना म्हटले की, मराठा समजाच्या दबावाला बळी पडून ओबीसी समाजातून आरक्षण दिल गेले तर ओबीसी समाज शांत बसणार नसून शासनाला त्यांची जागा दाखवून देईल.

COMMENTS