Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

श्रीमान गोकुळचंदजी विद्यालयाचे एन.एम.एम.एस. परीक्षेत यश

कोपरगाव शहर ः नुकत्याच जाहीर झालेल्या एन.एम.एन.एस.या शिष्यवृत्ती परीक्षामध्ये श्रीमान गोकुळचंदजी विदयालयांने अभुतपुर्व यश संपादन केले. यामध्ये  ए

भविष्यात पर्यटन क्षेत्रात मोठी संधी- किशोर मरकड 
बायोडिझेल कारवाईचा मागवला अहवाल ; पोलिस अधीक्षक पाटील यांचे कोतवालीला आदेश
कुळधरणमधील शेतकरी कुकडी आवर्तनापासून वंचितच

कोपरगाव शहर ः नुकत्याच जाहीर झालेल्या एन.एम.एन.एस.या शिष्यवृत्ती परीक्षामध्ये श्रीमान गोकुळचंदजी विदयालयांने अभुतपुर्व यश संपादन केले. यामध्ये  एन.एम.एम.एस. शिष्यवृत्ती परीक्षेत साई नारायण कुलकर्णी हा विद्यार्थी पात्र झाला असून या विद्यार्थ्यांला दरवर्षी 12 हजार रुपये याप्रमाणे इयत्ता 9 वी ते 12 वी अखेर चार वर्षांसाठी 48 हजार रुपये या विद्यार्थ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे.
सोबतच विद्यालयातील पाच विद्यार्थ्यांस सारथी शिष्यवृत्ती  प्राप्त  झाली असून त्यां मध्ये सायली अरुण घोडेराव,जान्हवी सचिन गूळे, साई दादासाहेब डांगे, पार्थ मच्छिंद्र लोहकणे,सुजल गजेंद्र साबळे हे विद्यार्थी पात्र झाले. या विद्यार्थ्यांना एकूण दोन लक्ष चाळीस हजार रुपये  शिष्यवृत्ती मिळणार आहे. या सर्व यशस्वी विदयार्थीचा गौरव करण्यात आला. पाहुण्याचे स्वागत उपमुख्याध्यापक रमेश गायकवाड यांनी केले.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक मकरंद को-हाळकर यांनी केले.कोपरगांव एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष कैलास ठोळे यांनी यशस्वी विदयार्थी अभिनंदन करुन पुढील वाटचालीत मदत करण्याचे जाहिर केले.संस्थेचे सचिव दिलीप अजमेरे यांनी यश संपादन केलेल्या विदयार्थीना या परीक्षेचा पुढील वाटचालीत  निश्‍चितच फायदा होईल असे सांगितले.शेवटी आभार पर्यवेक्षिका उमा रायते यांनी मानले.या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन श्‍वेता मालपुरे यांनी केले. या परीक्षेत उत्तुंग यश प्राप्त करणार्‍या या विद्यार्थ्यांना कुलदीप गोसावी, पंकज जगताप, जी.एन.जाधव, एस.डी.जाधव आदी शिक्षकांनी मार्गदर्शन केले. कोपरगाव एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष कैलास ठोळे, सचिव दिलीप अजमेरे, स्थानिक स्कुल कमिटीचे चेअरमन चंद्रकांत ठोळे,सहसचिव सचिन अजमेरे,सदस्य संदीप अजमेरे,आनंद ठोळे, डॉ. अमोल अजमेरे, राजेश ठोळे यांनी अभिनंदन केले आहे.या वेळी विदयार्थी,पालक,शिक्षक उपस्थित होते.

COMMENTS