Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नांदेड जिल्ह्यात दस्त नोंदणीतून सरकारी तिजोरीत 221 कोटी 43 लाखांचा महसूल; 18 कार्यालयांमधून 65 हजार 674 दस्तांची नोंदणी; ‘एक जिल्हा एक नोंदणी’ उपक्रमाला नागरिकांचा मोठा प्रतिसाद

नांदेड : प्रशासकीय पारदर्शकता आणि तंत्रज्ञानाच्या प्रभावी वापरामुळे नांदेड जिल्ह्यातील नोंदणी व मुद्रांक विभागाने सन 2025-26 या आर्थिक वर्षात उल्

सर्वसामान्य माणूस हाच आपला विठ्ठल, त्यासाठीच ‘टेक-वारी’! मुख्यमंत्री फडणवीस :’महाराष्ट्र प्रशिक्षण सप्ताहाचे उद्घाटन
‘लँड टायटलिंग अ‍ॅक्ट’ जुलैमध्ये लागू होणारमहाराष्ट्र ठरणार देशातील पहिले राज्य : महसूल मंत्री बावनकुळे
पायाभूत सुविधांमुळे शासनाच्या सेवा अधिक वेगवान; अपर मुख्य सचिव विकास चंद्र रस्तोगी यांचे प्रतिपादन
Land scam in Nanded district, revealed in the report of the District  Collector's Inquiry Committee | Nanded Land scam : नांदेड जिल्ह्यात भूखंड  घोटाळा, जिल्हाधिकाऱ्यांच्या चौकशी समितीच्या अहवालात उघड

नांदेड : प्रशासकीय पारदर्शकता आणि तंत्रज्ञानाच्या प्रभावी वापरामुळे नांदेड जिल्ह्यातील नोंदणी व मुद्रांक विभागाने सन 2025-26 या आर्थिक वर्षात उल्लेखनीय कामगिरी नोंदवली आहे. जिल्ह्यातील 18 सह दुय्यम निबंधक कार्यालयांमार्फत तब्बल 65 हजार  674 दस्तांची नोंदणी करण्यात आली असून, त्यातून शासनाच्या तिजोरीत 221 कोटी 43 लाख रुपयांचा महसूल जमा झाला आहे. याच कालावधीत  344 विशेष विवाह नोंदणीही यशस्वीरीत्या पार पडल्या आहेत.
सह जिल्हा निबंधक वर्ग-1 तथा मुद्रांक जिल्हाधिकारी महेश वडदकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी आणि त्यांना विविध योजनांची माहिती देण्यासाठी कार्यालयात विशेष माहिती कक्ष उभारण्यात आला आहे. तसेच सर्व सह दुय्यम निबंधक कार्यालयांच्या दर्शनी भागात शासनाच्या महत्त्वाच्या निर्णयांची माहिती देणारे फलक लावण्यात आले आहेत. शनिवार-रविवारीही सुरू दस्त नोंदणी सेवा नागरिकांच्या सोयीसाठी शासनाने महत्त्वाचा निर्णय घेत सुटीच्या दिवशीही दस्त नोंदणी सेवा उपलब्ध करून दिली आहे. दर शनिवार आणि रविवारी जिल्ह्यातील एक सह दुय्यम निबंधक कार्यालय सुरू ठेवण्यात येत असून, यामुळे नागरिकांना आपल्या सोयीनुसार दस्त नोंदणी करता येत आहे. ‘एक जिल्हा एक नोंदणी’ (जपश ऊळीीींळलीं जपश ठशसळीीींरींळेप) या संकल्पनेमुळे आता पक्षकारांना जिल्ह्यातील कोणत्याही कार्यालयात दस्त नोंदणी करण्याची सुविधा मिळाली आहे. त्यामुळे लांबचा प्रवास टाळून जवळच्या कार्यालयात नोंदणी प्रक्रिया पूर्ण करणे शक्य झाले आहे. महिलांसाठी मुद्रांक शुल्कात सवलत महिलांच्या नावे निवासी मालमत्ता खरेदी होत असल्यास शासनाकडून मुद्रांक शुल्कात 1 टक्क्यांची सवलत देण्यात येत आहे. तसेच जमीन महसूल संहिता  1966 च्या कलम 85 अंतर्गत सहधारकांनी केलेल्या शेतजमिनीच्या वाटपाच्या संलेखावर आणि वडिलोपार्जित जमिनीच्या वाटणीपत्रावर केवळ 100 रुपयांची नाममात्र नोंदणी फी आकारली जात आहे. ग्रामीण भागातील शेतजमिनीच्या वादांवर कायमस्वरूपी तोडगा निघावा आणि सामाजिक सलोखा टिकून राहावा यासाठी शासनाने ‘सलोखा योजना’ सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत वादग्रस्त शेतजमिनींच्या अदलाबदलीसाठी मुद्रांक शुल्क आणि नोंदणी फी प्रत्येकी फक्त 1 हजार रुपये करण्यात आली आहे. मध्यस्थांना फाटा देण्याचे आवाहन नोंदणी प्रक्रियेत पारदर्शकतेवर भर देताना मुद्रांक जिल्हाधिकारी महेश वडदकर यांनी नागरिकांना मध्यस्थांच्या आमिषाला बळी न पडण्याचे आवाहन केले. दस्त नोंदणी ही कायदेशीर आणि सोपी प्रक्रिया आहे. नागरिकांनी थेट सह दुय्यम निबंधक कार्यालयात जाऊन अधिकार्‍यांकडून प्रक्रिया समजून घ्यावी आणि स्वतःची कामे स्वतः करून घ्यावीत, असे त्यांनी स्पष्ट केले. अधिक माहितीसाठी नागरिकांनी खॠठच-क-ठ-डकढठ- या संकेतस्थळाला भेट द्यावी, असेही आवाहन करण्यात आले आहे. पारदर्शक व्यवहार हा प्रत्येक नागरिकाचा हक्क आहे आणि नोंदणी व मुद्रांक विभाग जनतेच्या सेवेसाठी सदैव तत्पर आहे, असेही महेश वडदकर यांनी सांगितले.

COMMENTS