Homeताज्या बातम्या

भंडारदरा येथुन पळवुन नेलेल्या मुलीचा खुन

आरोपीला राजुर पोलिसांनी ठोकल्या बेड्या

भंडारदरा प्रतिनिधी - भंडारदरा धरन परीसरातील शेंडी येथुन ऐक मुलगी बेपत्ता झाली होती. राजुर पोलिसांनी केलेल्या तपासात मुलीच्या प्रियकरानेच तीचा

श्री स्वामी समर्थ महाराज चरित्र | Shri Swami Samarth Maharaj | LokNews24 |
अमृतवाहिनीतून विद्यार्थ्यांना संस्काराची शिदोरी ः प्रा. बानगुडे
कर्जतमध्ये लाकडाची अवैध वाहतूक करणारे पीकअप पकडले

भंडारदरा प्रतिनिधी – भंडारदरा धरन परीसरातील शेंडी येथुन ऐक मुलगी बेपत्ता झाली होती. राजुर पोलिसांनी केलेल्या तपासात मुलीच्या प्रियकरानेच तीचा काटा काढला असुन आरोपी हा प्राथमिक शिक्षक आहे. शेंडी येथील भारती खादे या मुलीला नौकरीच्या नावाखाली गाडीत बसवुन आरोपींनी नेले होते. सदर मुलीची मिसींग तक्रार राजुर पोलिस स्टेशनला दाखल करण्यात आलेली होती. राजुर पोलिस स्टेशनचे सहाय्यक पो.नि. गणेश इंगळे यांनी तांत्रीक तपास करुन नाशिक येथुन एका आरोपीला अटक केल्यानंर प्रमुख आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत . 

सदर मुलीला वासळी येथील दत्तु धोंडु डगळे याने व त्याचा साथीदार मनोहर पुनाजी कोरडे यांनी शहापुर तालुक्यातील साकुर्ली परिसरातील एका दगडाच्या खाणीमध्ये मुलीला मारुन फेकुन दिले . सदर घटनेचा गुन्हा किनवली पोलिस स्टेशनला दाखल करण्यात आला होता.अतिशय शांत पद्धतीने राजुर पोलिसांच्या टीमने काम करुन बेपत्ता असलेल्या भारती खादे हीच्या खुनाचा तपास लावला असुन राजुर पोलिस स्टेशनचे सहाय्यक पो.नि.गणेश इंगळे , पो. उपनिरीक्षक ए जे शेख , दिलीप डगळे , अशोक काळे , अशोक गाडे , विजय फटांगरे , विजय मुंडे ,साईनाथ वर्पे  , सुनिल ढाकणे , कैलास नेहे , रोहीणी वाडेकर यांनी या तपासात भाग घेतला होता .राजुर पोलिसांच्या या  कामगिरीचे परीसरातुन कौतुक होत आहे.

COMMENTS