Homeताज्या बातम्यादेश

पंजाबमध्ये आप नेत्याची गोळ्या झाडून हत्या

चंदीगड : पंजाबमधील जालंधर शहरात शुक्रवारी सकाळी आम आदमी पार्टीचे नेते लकी ओबेरॉय यांची अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या झाडून हत्या केल्याची धक्कादायक घ

प.बंगालमध्ये भाजप कार्यकर्त्याची हत्या
परभणीत मनसे शहर प्रमुखाची हत्या !
राहुरीत पतीचा गळा दाबून खून

चंदीगड : पंजाबमधील जालंधर शहरात शुक्रवारी सकाळी आम आदमी पार्टीचे नेते लकी ओबेरॉय यांची अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या झाडून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. मॉडेल टाउन परिसरातील गुरुद्वारा साहिबजवळ हा थरारक हल्ला झाला असून, या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, लकी ओबेरॉय खासगी कामासाठी मॉडेल टाउन परिसरात आले होते. ते आपल्या थार गाडीत बसलेले असतानाच काही अज्ञात हल्लेखोरांनी अचानक त्यांच्या दिशेने गोळीबार सुरू केला. अगदी जवळून त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात गोळ्या झाडण्यात आल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. हल्ल्यानंतर हल्लेखोर घटनास्थळावरून फरार झाले. गंभीर जखमी अवस्थेत ओबेरॉय यांना तातडीने श्री राम स्पेशालिटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी उपचारादरम्यान त्यांना मृत घोषित केले. या घटनेची माहिती पसरताच शहरातील राजकीय वर्तुळात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या असून, अनेक नेते, कार्यकर्ते आणि समर्थक रुग्णालयात तसेच घटनास्थळी दाखल झाले. घटनेची गंभीर दखल घेत एडीसीपी जयंत पुरी यांच्यासह पोलिसांचे वरिष्ठ अधिकारी तात्काळ घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी परिसर सील करून तपास सुरू केला असून, आजूबाजूच्या सीसीटीव्ही कॅमेर्‍यांचे फुटेज तपासले जात आहे. हल्लेखोरांची ओळख पटवण्यासाठी विशेष पथके तयार करण्यात आली असून, हत्या पूर्वनियोजित असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या घटनेमुळे जालंधर शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, कायदा व सुव्यवस्थेच्या प्रश्‍नावरून राज्यातील राजकारण तापण्याची शक्यता आहे.

COMMENTS