वानखेडे कुटुंबियाविषयी वक्तव्य करण्यास मलिकांना मनाई

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

वानखेडे कुटुंबियाविषयी वक्तव्य करण्यास मलिकांना मनाई

मुंबई : गेल्या अनेक दिवसांपासून सातत्याने राष्ट्रवादी काँगे्रसचे नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावर

‘त्या’ दिवसांत नवऱ्याची साथ महत्वाची : प्रिया बापट
कतरिनाचा भाऊ स्टेबेस्टीयन आणि अभिनेत्री इलियाना डिक्रूज रिलेशनशिपमध्ये.
माजलगाव शहर पोलिस ठाणे येथे इफ्तार पार्टी उत्साहात साजरी

मुंबई : गेल्या अनेक दिवसांपासून सातत्याने राष्ट्रवादी काँगे्रसचे नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावर आरोप करत होते. याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने मलिकांना दणका दिला असून, वानखेडे कुटुंबियाविरोधात आता कोणतेही वक्तव्य किंवा आरोप त्यांना करता येणार नाही. त्यानंतर वानखेडे कुटुंबाबद्दल सोशल मीडियावर काहीही पोस्ट करणार नाही, अशी हमी मलिक यांनी वकिलांच्या माध्यमातून मलिक यांनी मुंबई हायकोर्टाला दिली.
मुंबई हायकोर्टाने नवाब मलिक यांना वानखेडे कुटुंबियांविरोधात 9 डिसेंबरपर्यंत कोणतंही वक्तव्य करण्यास मज्जाव केला आहे. समीर वानखेडे यांचे वडील ज्ञानदेव वानखेडे यांनी एकसदस्यीय खंडपीठाच्या निर्णयाविरोधात मुंबईत हायकोर्टात अपील केली होती. मानहानीच्या दाव्यात खंडपीठाने नवाब मलिकांविरोधात अंतरीम आदेश देण्यास नकार दिला होता. सुनावणीदरम्यान कोर्टाने नवाब मलिक यांच्या वकिलांवर प्रश्‍नांची सरबत्ती केली. नवाब मलिक फक्त आरोपांवर न थांबता रितसर तक्रार का केली नाही? अशी विचारणा कोर्टाकडून करण्यात आली. केवळ प्रसिद्धीसाठी हे केलं जात आहे का? फक्त ट्वीट करुन किंवा माध्यमांमध्ये प्रतिक्रिया देत काय साध्य करण्याचा प्रयत्न केला जात आहे? असेही कोर्टाने विचारले. मुंबई उच्च न्यायालयाने नवाब मलिक यांना वानखेडे कुटुंबियांविरोधात पुढील सुनावणी म्हणजेच 9 डिसेंबरपर्यंत कोणतंही वक्तव्य करु नये असे सांगितले आहे. दरम्यान नवाब मलिक यांनीदेखील कोर्टाला कोणतंही वक्तव्य न करण्याची हमी दिली आहे. कोणत्याही अधिकार्‍याबद्दल कोणतेही विधान करण्यापूर्वी माहितीची पडताळणी केली पाहिजे. नवाब मलिक यांनी केलेले आरोप पूर्णपणे चुकीचे आहेत, असे या टप्प्यावर म्हणणे योग्य ठरणार नाही. नवाब मालक पोस्ट करू शकतात. परंतु कोणतीही गोष्ट पूर्ण पडताळणीनंतरच पोस्ट करावी, असा सल्ला कोर्टाने नवाब मलिक यांना दिला होता.

COMMENTS