Homeताज्या बातम्याबीड

कु. हर्मिका जगतकर यांचे बारावी विज्ञान शाखेत उल्लेखनीय यश; 76% गुणांसह उत्तीर्ण

पत्रकार बालाजी जगतकर यांची कन्या कु. हर्मिका बालाजी जगतकर हिने इयत्ता बारावी विज्ञान शाखेच्या परीक्षेत 76 टक्के गुण मिळवत उत्तुंग यश संपादन केले

वक्फ सेवा इनाम जमिनीवरील अनधिकृत पत्र्याचे शेड हटविण्याची मागणीकलीम अहमद शेख यांचे प्रशासनाला निवेदन
नीट घोटाळ्यातील आरोपी पी. व्ही. कुलकर्णीने स्वतःच्याच इमारतीवर चालवला बुलडोझर
मलकापूर येथील शेतरस्त्यावरील अतिक्रमण हाटवले, 2 वर्षानंतर रस्ता मोकळा  तहसील प्रशासनाचे आभार – भागवत गीते



पत्रकार बालाजी जगतकर यांची कन्या कु. हर्मिका बालाजी जगतकर हिने इयत्ता बारावी विज्ञान शाखेच्या परीक्षेत 76 टक्के गुण मिळवत उत्तुंग यश संपादन केले आहे. बीड येथील श्री बंकट स्वामी विद्यालयाची विद्यार्थिनी असलेल्या हर्मिकाने आपल्या कठोर मेहनत, शिस्तबद्ध अभ्यास आणि आत्मविश्वासाच्या जोरावर हे यश मिळवले.
विशेष बाब म्हणजे, तिने कोणत्याही खासगी शिकवणीचा आधार न घेता केवळ नियमित अभ्यास व सातत्यपूर्ण सरावाच्या बळावर हे यश संपादन केले आहे. तिच्या या कामगिरीचे सर्व स्तरांतून कौतुक होत असून शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे. भविष्यात उच्च शैक्षणिक यश संपादन करून मोठ्या पदावर कार्य करण्याचा मानस तिने व्यक्त केला आहे. या यशामुळे तिच्या कुटुंबासह शाळेचीही मान उंचावली आहे. कु. हर्मिका जगतकर यांच्या पुढील शैक्षणिक प्रवासासाठी सर्वत्र शुभेच्छा व्यक्त करण्यात येत आहेत.

COMMENTS