रेल्वेत चढतांना पाय घसरला… महिला रक्षकाने वाचवले प्राण… पहा व्हिडीओ

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

रेल्वेत चढतांना पाय घसरला… महिला रक्षकाने वाचवले प्राण… पहा व्हिडीओ

भायखळा रेल्वे स्टेशनवर एक थरारक घटना घडली आहे. एक ५० वर्षीय महिला धावत्या रेल्वेत चढण्याचा प्रयत्न करत होती. रेल्वेत चढत असताना या ५० वर्षीय महिलेचा

Mumbai : विचित्र पद्धतीने वाढदिवस साजरा (Video)
आधीच लॉकडाउन लावून यांनी मुंबईकरांची रोजीरोटी संपवली… भातखळकरांचे टीकास्त्र
शिवसेनेचा विरोध मावळला… मुंबई- अहमदाबाद बुलेट ट्रेनचा मार्ग मोकळा…

भायखळा रेल्वे स्टेशनवर एक थरारक घटना घडली आहे. एक ५० वर्षीय महिला धावत्या रेल्वेत चढण्याचा प्रयत्न करत होती. रेल्वेत चढत असताना या ५० वर्षीय महिलेचा पाय अचानक घसरला. पाय घसरल्याने ही महिला रेल्वेच्या खाली अडकून तिचा जीव जाण्याची शक्यता होती. मात्र, यावेळी रेल्वे स्थानकावर कार्यरत असलेल्या महिला रक्षक सपना गोलकर यांनी जीवाची बाजी लावत या महिलेचे प्राण वाचवले. ही सर्व घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. २१ ऑकटोबर रोजी दुपारी सव्वा दोन वाजता ही घटना घडली. प्लॅटफॉर्म क्रमांक १ वर बदलापूरकडे जाणारी रेल्वे आली होती. त्यावेळी ही महिला चालत्या रेल्वेत चढण्याचा प्रयत्न करत होती. याच दरम्यान, तिचा पाय घसरला आणि ती खाली पडली. त्यावेळी कर्तव्य बजावत असलेल्या महिला रक्षकाने वेळीच प्रसंगावधान दाखवत तिचे प्राण वाचवले. याबाबतचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने महिला रक्षकाचे कौतुक होत आहे.

COMMENTS