Homeताज्या बातम्याक्रीडा

दक्षिण कोरियाचा पराभव करून भारत उपांत्य फेरीत पोहोचला

ऑलिम्पिक स्पर्धेत दमदार कामगिरीचा इतिहास असलेल्या भारतीय पुरूष हॉकी संघाने आपल्या लौकिकाला साजेसा खेळ करणं सुरू ठेवलं. भारताने उपांत्यपूर्व फेरीत

एनसीसीमध्ये मुलींनी प्रवेश घेतल्यास करीयर घडविता येते : कु. आयुषी भांड
मुंबई इंडियन्सचे कर्णधारपद सूर्यकुमार यादवकडे
पाकिस्तानने क्रिकेट सामना जिंकल्यावर खाल्ला मार…आफगानिस्थानने धु धु धुतलं.

ऑलिम्पिक स्पर्धेत दमदार कामगिरीचा इतिहास असलेल्या भारतीय पुरूष हॉकी संघाने आपल्या लौकिकाला साजेसा खेळ करणं सुरू ठेवलं. भारताने उपांत्यपूर्व फेरीत ग्रेट ब्रिटनच्या संघाला ३-१ असे पराभूत केले आणि ऑलिम्पिक स्पर्धेचे सेमीफायनलचे तिकीट मिळवले. आता भारताचा पुढील सामना बेल्जियमशी होणार आहे. दिलप्रीत सिंग, गुरजंत सिंग आणि हार्दिक सिंग या तिघांनी भारताकडून प्रत्येकी एक-एक गोला केला. सामना सुरू झाला तेव्हापासूनच भारतीय संघाने आक्रमणाला सुरूवात केली. सामन्याचा निकाल काय लागेल याची कल्पना खूपच लवकर चाहत्यांना आली होती. कारण भारतीय संघाने आक्रमक खेळ करत पूर्वार्धात २-० ने आघाडी घेतली होती. उत्तरार्धात संघातील काही खेळाडूंच्या चुकांमुळे ग्रेट ब्रिटनला एक गोल करण्याची संधी मिळाली. भारताने पुन्हा गोल करत सामना ३-१ असा जिंकला. महत्त्वाची बाब म्हणजे भारतीय संघाला तब्बल ४१ वर्षांनी ऑलिम्पिकच्या सेमीफायनलमध्ये धडक मारणं शक्य झालं.

COMMENTS