Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सावकाराचा पतीसमोरच पत्नीवर अत्याचार

कर्ज न फेडल्यामुळे केला अत्याचार पुण्यातील संतापजनक घटना

पुणे/प्रतिनिधी ः पुण्यामध्ये सावरकाराकडून सर्वसामान्यांची पिळवणूक होत असल्याच्या अनेक घटना समोर आल्यानंतर आता पुण्यामध्ये खासगी सावकाराने एका महि

कोरोना संसर्ग साखळी तोडण्यास सर्वोच्च प्राधान्य: जिल्हाधिकारी डॉ. भोसले
दारूच्या नशेत कुटुंबावरच झाडल्या गोळ्या l LOK News 24
अमेरिकेच्या जेबीएल कंपनीची महाराष्ट्रात मोठी गुंतवणूक; पुण्यात उभारणार प्रकल्प

पुणे/प्रतिनिधी ः पुण्यामध्ये सावरकाराकडून सर्वसामान्यांची पिळवणूक होत असल्याच्या अनेक घटना समोर आल्यानंतर आता पुण्यामध्ये खासगी सावकाराने एका महिलेवर तिच्या पतीसमोर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. उसने पैसे पती परत देऊ शकला नाही म्हणून सावकाराने हे भयानक कृत्य केले आहे. या सावकाराला पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेने पुणे हादरले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यामध्ये उसने पैसे परत देऊन न शकल्यामुळे खासगी सावकाराने एका व्यक्तीच्या पत्नीवर बलात्कार केला आहे. या सावकाराने या व्यक्तीच्या समोरच त्याच्या पत्नीवर बलात्कार केला आहे. पुण्यातील हडपसर परिसरात फेब्रुवारी 2023 मध्ये ही घटना घडली होती. मात्र मंगळवारी 34 वर्षीय विवाहित महिलेने विवाहित महिलेने या प्रकरणी हडपसर पोलिस ठाण्यात तक्रार दिल्याने हा सगळा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी इम्तियाज हसीन शेख याला अटक केली आहे. पीडित महिलेच्या पतीला आरोपीने उसने पैसे दिले होते. उधारी वर घेतलेले हे पैसे फिर्यादीचा पती परत करू शकला नाही. त्यामुळे आरोपीने फिर्यादी आणि तिच्या पतीला जीवे मारण्याची धमकी दिली. आरोपीने या पती आणि पत्नीला भेटायला बोलावले. त्यानंतर आरोपीने फिर्यादीच्या पतीला समोर बसून चाकूचा धाक दाखवून ठार मारण्याची धमकी दिली. त्यानंतर आरोपीने फिर्यादीसोबत जबरदस्तीने शरीरसंबंध ठेवले. आरोपीने या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ आपल्या मोबाईलमध्ये शूट केला होता आणि सोशल मीडियावर व्हायरल केला होता. फेब्रुवारीमध्ये घडलेल्या या घटनेप्रकरणी पीडित महिलेने हडपसर पोलीस ठाण्यात मंगळवारी धाव घेत आरोपीविरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी या तक्रारीवरुन इम्तियाज हसीन शेखविरोधात गुन्हा दाखल केला आणि त्याला अटक केली. या घटनेमुळे पुण्यामध्ये खळबळ उडाली आहे.

COMMENTS