Homeताज्या बातम्या

मुलांना मोबाईल देण्यापेक्षा आजी-आजोबांकडे सोपवाराष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांचे प्रतिपादन

नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांना मोबाईलच्या आहारी न लावता आजी-आजोबांच्या सहव

अहमदपूर बाजार समितीवर महाविकास आघाडीने मारली बाजी
इंदोरच्या धर्तीवर छत्रपती संभाजीनगरचे सुशोभीकरण; नांदेडच्या ‘विकसित’ संकल्पनेचे काय झाले?भाजपच्या संकल्पनाम्यातील आश्‍वासनांची अंमलबजावणी कधी; स्वच्छ, पर्यावरणपूरक व आधुनिक नांदेडची नागरिकांना प्रतीक्षा
सत्यशोधन पत्रकारितेचा गौरव : सुनील जोशी यांना उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार
मुलांना मोबाईल नव्हे संवादाची गरज; एकटेपणा, नैराश्य आणि आत्महत्यांच्या वाढत्या घटनांवर सरसंघचालकांनी व्यक्त केली चिंता Nagpur Marathi News | Children ...


नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांना मोबाईलच्या आहारी न लावता आजी-आजोबांच्या सहवासात वाढविण्याची गरज अधोरेखित केली. नागपूर येथे आयोजित सन्मार्ग मानसिक आरोग्य, व्यसनमुक्ती आणि पुनर्वसन केंद्राच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
त्यांनी सांगितले की, पूर्वीच्या संयुक्त कुटुंबपद्धतीत आजी-आजोबा नातवंडांना कथा, अनुभव आणि जीवनमूल्यांच्या माध्यमातून संस्कार देत असत. या प्रक्रियेत मुलांच्या मनाची जडणघडण नैसर्गिकरीत्या होत असे. मात्र, बदलत्या जीवनशैलीमुळे कुटुंबव्यवस्थेतील बंध सैल होत असून अनेक ज्येष्ठ नागरिकांना वृद्धाश्रमांचा आधार घ्यावा लागत आहे. परिणामी, लहान मुलांचा वेळ मोबाईल आणि आभासी माध्यमांमध्ये अधिक व्यतीत होत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. मोबाईलचा अतिरेक मुलांच्या मानसिक संतुलनावर परिणाम करू शकतो. संवाद, सर्जनशीलता आणि कुटुंबातील आत्मीयता कमी झाल्यास मुलांमध्ये एकाकीपणाची भावना वाढीस लागते. त्यामुळे पालकांनी मुलांसोबत अधिक वेळ घालवून त्यांच्याशी सातत्याने संवाद साधण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी नमूद केले. आजच्या पिढीसमोर वाढत्या मानसिक तणावाचे आव्हान उभे ठाकले आहे. शैक्षणिक अपयश किंवा किरकोळ अडचणींमुळे काही तरुण टोकाची पावले उचलताना दिसतात. जीवनातील संकटांचा धैर्याने सामना करण्यासाठी मनाची कणखरता आवश्यक असून ती घरातील वातावरण, संस्कार आणि सामाजिक आधारातून विकसित होते, असे त्यांनी स्पष्ट केले. मानवाच्या व्यक्तिमत्त्वाची जडणघडण गर्भावस्थेपासूनच सुरू होत असल्याचे सांगत त्यांनी अनुभव, संस्कार आणि वातावरण यांचा मनावर खोल परिणाम होत असल्याचे अधोरेखित केले. मुलांना योग्य मार्गदर्शन आणि भावनिक आधार मिळाला, तर त्यांच्यात आत्मविश्‍वास आणि सकारात्मकता वृद्धिंगत होते, असे त्यांनी म्हटले. यावेळी त्यांनी मानसशास्त्राच्या अभ्यासाविषयीही विचार मांडले. जगातील विविध विचारप्रवाहांचा अभ्यास महत्त्वाचा असला, तरी भारतीय तत्त्वज्ञानात मन, आत्मसंयम आणि जीवनमूल्यांविषयी समृद्ध परंपरा उपलब्ध असल्याचे त्यांनी सांगितले. पतंजली योगसूत्र आणि योगवासिष्ठ यांसारख्या प्राचीन ग्रंथांमध्ये मानवी मनाचा सखोल अभ्यास आढळतो. या ज्ञानपरंपरेवर अधिक संशोधन होणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. भारतीय आणि जागतिक विचारसरणींचा समन्वय साधून मानवी कल्याणाला पूरक असे व्यापक भारतीय मानसशास्त्र विकसित करण्याची काळाची गरज असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. कुटुंबव्यवस्था, संस्कार आणि संवाद यांनाच सुदृढ समाजनिर्मितीचा पाया मानला पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले.

COMMENTS