राहाता : नुकतेच विधानपरिषदेवर निवडून गेलेले युवा, अभ्यासू व तडफदार आमदार विवेक भैय्या कोल्हे यांचा राहाता येथे भाजपा नेते डॉ. राजेंद्र पिपाडा यां

राहाता : नुकतेच विधानपरिषदेवर निवडून गेलेले युवा, अभ्यासू व तडफदार आमदार विवेक भैय्या कोल्हे यांचा राहाता येथे भाजपा नेते डॉ. राजेंद्र पिपाडा यांच्या हस्ते उत्साहपूर्ण सत्कार करण्यात आला. यावेळी विविध राजकीय व सामाजिक क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या प्रसंगी धनंजयजी गाडेकर, आरपीआयचे नेते दिलीपराव वाघमारे, मनसेचे विजय मोगले, नगरसेवक शशिकांत लोळगे, सुनिल बोठे, रणजित बोठे, निवृत्ती गाडेकर, अभिजित काळे यांच्यासह अनेक कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते. सत्कार समारंभ अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. आमदार विवेक भैय्या कोल्हे यांनी उपस्थित कार्यकर्ते, पदाधिकारी व मित्रपरिवारासमवेत मनमोकळ्या गप्पा मारत जुन्या आठवणींना उजाळा दिला. अनेक सामाजिक व राजकीय प्रवासातील प्रसंग त्यांनी उपस्थितांसमोर मांडले. त्यांच्या साध्या, आपुलकीच्या व कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधणार्या स्वभावामुळे उपस्थितांमध्ये विशेष उत्साह निर्माण झाला. राजकारणात तरुण नेतृत्वाची गरज असताना विवेक भैय्या कोल्हे यांच्यासारखा अभ्यासू, धडाडीचा आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर भक्कम भूमिका घेणारा नेता विधानपरिषदेत पोहोचल्याने कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असल्याची भावना यावेळी अनेकांनी व्यक्त केली. भाजपा नेते डॉ. राजेंद्र पिपाडा यांनी आपल्या शुभेच्छा व्यक्त करताना सांगितले की, विवेक भैय्या कोल्हे यांचे नेतृत्व हे युवकांसाठी प्रेरणादायी असून त्यांच्या माध्यमातून जनतेचे प्रश्न अधिक प्रभावीपणे मांडले जातील. त्यांच्या निवडीमुळे सर्वसामान्य कार्यकर्त्यांना नवी ऊर्जा मिळाली आहे. समारंभाच्या शेवटी उपस्थितांनी आमदार विवेक भैय्या कोल्हे यांना पुढील राजकीय व सामाजिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. संपूर्ण कार्यक्रमात उत्साह, आत्मीयता आणि कार्यकर्त्यांमधील एकजूट यांचे सुंदर दर्शन घडले.

COMMENTS