Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शिंदे फडणवीस सरकार एक दिवशी कोसळेल ः दिलीप वळसे पाटील

पुणे प्रतिनिधी : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी जागा वाटपाबाबत विधान केल्यानंतर शिंदे आणि फडणवीस सरकारमधील अनेक चर्चाना उधाण आले आहे

नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गाच्या जागांवरील निवडणुकांना स्थगिती
कोरोना संकटाचा मुकाबला करण्यासाठी सामुहीक प्रयत्नाची गरज : विवेकभैया कोल्हे.
विदेशी गुंतवणुकीत महाराष्ट्राची भरारी

पुणे प्रतिनिधी : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी जागा वाटपाबाबत विधान केल्यानंतर शिंदे आणि फडणवीस सरकारमधील अनेक चर्चाना उधाण आले आहे. त्या प्रश्‍नावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते माजी मंत्री दिलीप वळसे पाटील म्हणाले की, या राज्य सरकार मधील अंतर्गत घटना सर्वांना माहिती असून त्यामुळे हे सरकार फार काही काळ तग धरू शकणार नाही. त्यामुळे दोन्ही पक्षातील आमदाराच्या भावनावर एकमत होणे अवघड दिसत आहे. त्यामुळे हे सरकार जोपर्यंत चालेल तोपर्यंत चालेल आणि हे सरकार एक दिवशी थांबेल अशी भूमिका त्यावर त्यांनी मांडली.
राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार हे बेताल वक्तव्य करीत आहे. त्या प्रश्‍नावर दिलीप वळसे पाटील म्हणाले की, राज्याच्या कृषी मंत्र्यांना अजिबात गांभीर्य नाही.तसेच तो विषय त्यांना समजतो का नाही. त्याबाबत मला माहिती नाही असे सांगत अब्दुल सत्तार यांना त्यांनी टोला लगावला. भाजपचे नेते गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नीला खंडणीच्या प्रकरणाला सामोरे जावे लागले आहे. त्या प्रश्‍नावर दिलीप वळसे पाटील म्हणाले की, अंतिम आठवड्याचा प्रस्ताव गृह विभागासंदर्भात असणार आहे. त्यावेळी मागील काही महिन्यात राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. त्याबाबत जाब विचारणार असून त्या विषयावर देखील आम्ही चर्चा करणार असल्याचे त्यांनी सांगितले. जुन्या पेन्शन मागणीसाठी सरकारी कर्मचारी बेमुदत संपावर गेले आहेत.त्यामुळे अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकर्याचे पंचनामे झाले नाही. यामुळे शेतकर्‍यांमध्ये नाराजी आहे. त्या प्रश्‍नावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते माजी मंत्री दिलीप वळसे पाटील म्हणाले की, सरकारच्या बाजूने पंचनामे झाले पाहिजे.मात्र ते होताना दिसत नसून कर्मचारी संपावर असल्याच राज्य सरकारकडून सांगितले जात आहे. हे काही योग्य नसून राज्य सरकारने अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना कोणत्याही परिस्थितीत सानुग्रह अनुदान दिले पाहिजे. या मागणीसाठी आम्ही उद्या विधिमंडळात आवाज उठवणार असल्याच त्यांनी यावेळी सांगितले.

COMMENTS