Homeताज्या बातम्या

संस्था मोठी होणे हे संस्थापकांच्या कष्टाचे चीज; आमदार आशुतोष काळे यांचे प्रतिपादन

कोपरगाव : कोणतीही सहकारी संस्था स्थापन करणे अतिशय अवघड असते, पण त्यापेक्षा ती संस्था योग्य पद्धतीने चालविणे अधिक आव्हानात्मक आहे. संस्था केवळ इमा

उद्या कोपरगावात गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव
कान्हेगावच्या उपसरपंचपदी काळे गटाचे वाळूंज  
कोपरगावात निळवंडेचे पाणी आमदार आशुतोष काळे यांच्यामुळेच आले; माजी सरपंच ज्ञानेश्वर गव्हाणे यांचा दावा

कोपरगाव : कोणतीही सहकारी संस्था स्थापन करणे अतिशय अवघड असते, पण त्यापेक्षा ती संस्था योग्य पद्धतीने चालविणे अधिक आव्हानात्मक आहे. संस्था केवळ इमारतीने मोठी होत नाही, तर तिच्यामागे उभे असलेले कार्यकर्ते आणि त्यागी माणसांच्या कष्टातून ती मोठी होते. जेव्हा संस्थेचा फायदा सर्वसामान्य नागरिकांना होतो, तेव्हाच संस्थापकांच्या कष्टाचे आणि त्यागाचे खऱ्या अर्थाने चीज होते, असे प्रतिपादन आमदार आशुतोष काळे यांनी केले आहे.

कोपरगाव तालुक्यातील सोनेवाडी येथे कै. अर्जुनराव पंढरीनाथ पाटील माळशिकारे विविध कार्यकारी सेवा सोसायटीचा नामकरण सोहळा माजी आमदार अशोकराव काळे यांच्या अध्यक्षतेखाली व आमदार आशुतोष काळे यांच्या हस्ते पार पडला. याप्रसंगी ते बोलत होते.

या कार्यक्रमाला सहकारी संस्था सहाय्यक निबंधक संदीपकुमार रुद्राक्ष, कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष प्रवीण शिंदे, माजी उपाध्यक्ष विश्वासराव आहेर, बाळासाहेब कदम, कारभारी आगवन, नारायणराव मांजरे, ज्ञानदेव मांजरे यांच्यासह संस्थेचे संचालक, पंचक्रोशीतील सरपंच, उपसरपंच आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

COMMENTS