HomeUncategorized

बसस्थानकात एसटीच्या चालकाकडून विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न

आष्टी / प्रतिनिधी : अधिकार्‍याने बळजबरीने कर्तव्यावर पाठविले आणि वेतनवाढ होत नसल्याचा आरोप करत चालकाने बसस्थानकातच विष प्राशन केल्याची घटना गुरुव

दांडेघर येथील डोंगराला मोठ-मोठ्या भेगा; शाळेच्या इमारतीला धोका
ऑल पार्टी डेलिगेशन संसदीय असले पाहिजे : पृथ्वीराज चव्हाण
जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाशी संपर्क साधून योजनांचा लाभ घ्यावा; मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती मिलींद जाधव यांचे आवाहन

आष्टी / प्रतिनिधी : अधिकार्‍याने बळजबरीने कर्तव्यावर पाठविले आणि वेतनवाढ होत नसल्याचा आरोप करत चालकाने बसस्थानकातच विष प्राशन केल्याची घटना गुरुवारी (ता. चार) कडा येथे घडली. बाळू कदम असे विष प्राशन केलेल्या चालकाचे नाव असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. आष्टी आगाराची जामखेड-आष्टी ही जादा बस आष्टीहून पुण्याला पाठविली. आता जीव गेल्यावर तुम्ही आमच्याकडे लक्ष देणार का? म्हणत आष्टी आगाराच्या कर्मचार्‍यांनी काम बंद आंदोलन सुरू केले आहे.
गुरूवार, दि. 4 रोजी दुपारी 2 वाजता आष्टी आगाराचे, आगार प्रमुख संतोष डोके यांनी वाहन चालक बाळू कदम यांना कर्तव्यावर येण्यास सांगितले असता त्यास वाहन चालक कदम यांनी नकार दिला. परंतू बळजबरीने आगार प्रमुखांनी वाहन चालक बाळू कदम याला सांगितल्याने जामखेड-पुणे ही जादा बस घेऊन ते अडीचच्या दरम्यान पुण्याला निघाले. बस दुपारी तीन वाजता कडा बसस्थानकावर आल्यानंतर वाहन चालक बाळू कदम याने कडा बसस्थानकावर बस थांबविली. बसस्थानकाच्या बाहेर असलेल्या कृषी दुकानात गेले. फवारणीचे औषध खरेदी केले. मी आता औषध घेतो असे वाहकाला म्हणत, कडा-आष्टी रोडवरील नदीच्या कडेला हे विषारी औषध प्राशन करण्यासाठी गेले.
यावेळी वाहक साळवे व विभाग नियंत्रक आयशा शेख यांनी पळत जाऊन त्यांना अडविण्याचा प्रयत्न केला. परंतू तोपर्यंत त्यांनी विष प्राशन केले होते. त्यानंतर तात्काळ बाळू कदम यांना कडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने पुढील उपचारासाठी आष्टी येथील ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

COMMENTS