Homeताज्या बातम्यामुंबई - ठाणे

आ. रोहित पवारांची ईडीच्या फेर्‍यातून सुटका

मुंबई : महाराष्ट्र राज्य सहकारी बँक प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे आमदार रोहित पवार यांना न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे

ओबीसींची दुसर्‍या टप्प्यात स्वतंत्र जनगणनामंत्री भुजबळ : जातीनिहाय जनगणनेचा मार्ग मोकळा
महागाईवरून काँगे्रसचा आक्रमक पवित्रा
मनमानी भाडेवाढ करणार्‍या खासगीबस वाहतूकदार आणि अवैध प्रवासी अ‍ॅपवर कारवाई करा: मंत्री सरनाईक


मुंबई : महाराष्ट्र राज्य सहकारी बँक प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे आमदार रोहित पवार यांना न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. अंमलबजावणी संचालनालय अर्थात ईडीने दाखल केलेल्या पूरक आरोपपत्रानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीत न्यायालयाने त्यांना दिलासा दिल्याने या प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे.
या निर्णयानंतर रोहित पवार यांनी समाजमाध्यमांवर प्रतिक्रिया देत न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्‍वास असल्याचे स्पष्ट केले. सत्यावर विश्‍वास ठेवल्यानेच न्याय मिळाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. या प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने आर्थिक गैरव्यवहार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत कारवाई करत रोहित पवार आणि त्यांच्या सहकार्‍यांविरोधात आरोपपत्र दाखल केले होते. तपासादरम्यान बारामती येथील कृषी उद्योगाशी संबंधित कंपनीच्या माध्यमातून मिळवलेल्या मालमत्तांवर कारवाई करण्यात आली होती. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड परिसरातील जमीन, साखर कारखाना, यंत्रसामग्री आणि इमारतींसह मोठ्या मूल्याची मालमत्ता जप्त करण्यात आली होती. अंमलबजावणी संचालनालयाच्या मते, कन्नड सहकारी साखर कारखान्याच्या लिलाव प्रक्रियेत अनियमितता झाली असून कमी किमतीत मालमत्ता हस्तांतरित करण्यात आली. या व्यवहारातून काही संबंधितांना अनुचित लाभ मिळाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता.

COMMENTS