Homeताज्या बातम्या

शिवसेनेचं चिन्ह आम्हालाच मिळणार! नाही मिळालं तर गोठवलं जाईल; उद्धव ठाकरेंचा मोठा दावा

शिवसेना पक्षाच्या चिन्हावरून सुरू असलेल्या कायदेशीर लढाईदरम्यान उद्धव ठाकरे यांनी मोठं आणि महत्त्वाचं विधान केलं आहे. "शिवसेनेचं चिन्ह आम्हालाच म

उद्धव ठाकरेंचा निर्धार ;  वांगचूक यांच्या आंदोलनाला जाहीर पाठिंबा
विधान परिषदेतील पराभवानंतर ठाकरे गटाचा दणका!उमेदवार कृष्णा पाटील आष्टीकर यांची शिवसेनेतून हकालपट्टी; शिंदे सेनेत जाण्याच्या चर्चांना उधाण
ठाकरे गटाचे आमदारही फूटीच्या उंबरट्यावर ?उद्धव ठाकरेंनी उद्या मातोश्रीवर बोलावली तातडीची बैठक
Sena headed by me is the only Shiv Sena: Uddhav Thackeray, says he isn't  demoralised

शिवसेना पक्षाच्या चिन्हावरून सुरू असलेल्या कायदेशीर लढाईदरम्यान उद्धव ठाकरे यांनी मोठं आणि महत्त्वाचं विधान केलं आहे. “शिवसेनेचं चिन्ह आम्हालाच मिळणार… आणि जर मिळालंच नाही, तर ते गोठवलं जाईल,” असा ठाम विश्वास उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला आहे.आज शिवसेना ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुख आणि विधानसभा संपर्कप्रमुखांची महत्त्वाची ऑनलाइन बैठक शिवसेना भवनात पार पडली. या बैठकीत सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या शिवसेना चिन्हाच्या प्रकरणावर चर्चा झाली.उद्धव ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करत सांगितलं की, पक्षाच्या चिन्हाबाबत न्यायालयात आपली बाजू भक्कम असून न्याय मिळेल, असा त्यांना विश्वास आहे. मात्र, जर चिन्ह मिळालं नाही, तर ते गोठवलं जाण्याची शक्यता असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.यावेळी त्यांनी संघटनात्मक कामांवरही भर दिला. एसआयआर प्रक्रियेवर गांभीर्याने लक्ष द्या, अशा सूचना देतानाच, ज्यांना पक्षाने दिलेली जबाबदारी पार पाडता येत नसेल त्यांनी पद सोडावं, अन्यथा ती जबाबदारी दुसऱ्यांकडे दिली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.इतकंच नाही, तर 2029 च्या विधानसभा निवडणुकीची तयारी आतापासूनच सुरू करा, असा संदेशही उद्धव ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना दिला.दरम्यान, 2022 मध्ये एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेत फूट पडली होती. त्यानंतर निवडणूक आयोगाने पक्षाचं नाव आणि धनुष्यबाण चिन्ह शिंदे गटाला दिलं. त्या निर्णयाला ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं असून, या प्रकरणाची सुनावणी सध्या सुरू आहे.आता सर्वोच्च न्यायालयाचा अंतिम निर्णय काय येतो आणि शिवसेनेचं चिन्ह नेमकं कोणाच्या वाट्याला जातं, याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे.

COMMENTS