मुंबई : आमदार रोहित पवार यांची तब्येत बिघडल्याची माहिती समोर आली आहे. त्यांना ताप आल्याने अचानक चक्कर आली होती, त्यामुळे उपचारासाठी तातडीने मुंबई

मुंबई : आमदार रोहित पवार यांची तब्येत बिघडल्याची माहिती समोर आली आहे. त्यांना ताप आल्याने अचानक चक्कर आली होती, त्यामुळे उपचारासाठी तातडीने मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
अचानक चक्कर, ताप आणि अशक्तपणा जाणवल्याने रोहित पवार स्वतः रुग्णालयात दाखल झाले. ब्रीच कँडी रुग्णालयात सध्या डॉक्टरांकडून त्यांची तपासणी सुरू असून रक्त तपासणी आणि इतर महत्त्वाच्या चाचण्या करण्यात आल्या आहेत. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रोहित पवार हे गेल्या काही दिवसांपासून सतत दौऱ्यावर होते. या दरम्यान ताप आल्यामुळे आणि प्रकृती अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांनी स्वतःच ब्रीच कँडी रुग्णालयात जाऊन डॉक्टरांचा सल्ला घेण्याचा निर्णय घेतला. गेल्या दोन दिवसांपासून त्यांची तब्येत खालावली होती, त्यामुळे त्यांनी आज रुग्णालयात जाऊन तपासण्या करून घेतल्या. काळजीचे कोणतेही कारण नसून त्यांची प्रकृती पूर्णपणे स्थिर आहे.

COMMENTS