आरोपी आशिष मिश्राचा जामीन रद्द

Homeताज्या बातम्यादेश

आरोपी आशिष मिश्राचा जामीन रद्द

लखीमपूर खेरी हिंसाचारप्रकरणात सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय

नवी दिल्ली/प्रतिनिधी :उत्तरप्रदेशातील लखीमपूर खेरी हिंसाचारप्रकरणी केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांचे पुत्र आशिष मिश्रा अटकेत होते. मात्र अलाहा

प्रशांत दामलेंचा संगीत नाटक अकादमी पुरस्काराने सन्मान
महाधन क्रॉपटेकच्या सहाय्याने  कांदा उत्पादनात  १५ ते २० टक्क्यांनी वाढ 
 महाविकास आघाडीच्या उमेदवारांना निवडून द्या ः संभाजी ब्रिगेडचे महासचिव सौरभ खेडेकर

नवी दिल्ली/प्रतिनिधी :उत्तरप्रदेशातील लखीमपूर खेरी हिंसाचारप्रकरणी केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांचे पुत्र आशिष मिश्रा अटकेत होते. मात्र अलाहाबाद कोर्टाने त्याला जामीन मंजूर केल्यानंतर फिर्यादीच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने आशिष मिश्राचा जामीन अर्ज फेटाळून लावत, जामीन देणार्‍या अलाहाबाद कोर्टाला देखील चांगलेच फटकारले.
आशिष मिश्रा यांना मंजूर करण्यात आलेला जामीन सर्वोच्च न्यायालयाने रद्द ठरवत, आठवड्याभरात तुरुंगात पुन्हा परतण्याचे देखील आदेश न्यायालयाने दिले आहे. सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा आणि न्यायमूर्ती सूर्यकांत आणि हिमा कोहली यांच्या खंडपीठासमोर आशिष मिश्रा यांच्या जामिनाला आव्हान देणार्‍या याचिकेवर सुनावणी झाली. यानंतर राखून ठेवलेला निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला. यावेळी अलाहाबाद उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाविषयीही सर्वोच्च न्यायालयाने नाराजी व्यक्त केली आहे. 10 फेब्रुवारी रोजी अलाहाबाद उच्च न्यायालयाने आशिष मिश्रा यांना जामीन मंजूर केला होता. न्यायालयाच्या या निर्णयाविरोधात लखीमपूर खेरी हिंसाचारात मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तींच्या नातेवाईकांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. या याचिकेवर दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर 4 एप्रिल रोजी न्यायमूर्ती एन. व्ही. रमणा यांनी यासंदर्भातील निकाल राखून ठेवला होता. अखेर आज या निकालाचे वाचन करण्यात आल्यानंतर आशिष मिश्रा यांचा जामीन रद्द झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

अलाहाबाद न्यायालयाला फटकारले
सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा यांनी अलाहाबाद उच्च न्यायालयाने या प्रकरणात दिलेल्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली. यासंदर्भातला निकाल देताना अलाहाबाद उच्च न्यायालयाने चूक केली. त्यांनी गैरलागू तथ्यांचा संदर्भ घेतला. तसेच, दाखल गुन्हा हेच गॉस्पेलचे सत्य म्हणून स्वीकारले आणि आशिष मिश्रा यांना जामीन मंजूर केला, असे न्यायालयाने नमूद केले. तसेच, जामिनाला विरोध करण्याची संधी प्रतिवादींना नाकारून देखील अलाहाबाद न्यायालयाने चूक केली, असे देखील न्यायमूर्ती रमणा यांनी यावेळी म्हटले आहे.

COMMENTS