Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

आमदार मोनिका राजळे यांचे सहकार क्षेत्रातील वर्चस्व कायम

१७ पैकी १७ जागावर विजय मिळवत खरेदी विक्री संघाची पुन्हा सत्ता केली काबीज

पाथर्डी प्रतिनिधी - पाथर्डी तालुका खरेदी-विक्री संघाच्या निवडणूक प्रक्रिया बाबत कोणतीच माहिती दिली गेली नाही म्हणत मतदार यादीची होळी करून त्याला

पत्रकारांनी चांगल्या वाईट गोष्टी मांडण्याचे धाडस करावे -आमदार मोनिका राजळे
स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या विचारधारेवरच वाटचाल सुरु – आमदार मोनिका राजळे
भाजपने नाविन्यपूर्ण योजनांतून केला देशाचा विकास ः आमदार मोनिका राजळे

पाथर्डी प्रतिनिधी – पाथर्डी तालुका खरेदी-विक्री संघाच्या निवडणूक प्रक्रिया बाबत कोणतीच माहिती दिली गेली नाही म्हणत मतदार यादीची होळी करून त्याला प्रसारमाध्यमांमध्ये प्रसिद्धी मिळवत मी निवडणूक मध्ये सहभाग घेत नाही. हा विरोधकांचा आरोप आश्चर्यजनक असून निवडणुका त्यांना जमत नाही.मग कुठेतरी हे लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचे काम केले जाते अशी टीका आमदार मोनिका राजळे यांनी विरोधकांवर नाव न घेता केली.त्या पाथर्डी तालुका खरेदी विक्री संघावर सर्व जागा विजय मिळाल्यानंतर बोलत होत्या.त्यांनी या निवडणुकीत  १७ पैकी १७ जागा जिंकून चौथ्यादा सत्ता काबीज केली आहे.

           २२ डिसेंबर रोजी सुरू झालेल्या निवडणुकीत एकूण १७ जागा पैकी ७ जागा सहकारी संस्था प्रतिनिधी मतदारसंघाच्या १० जागेसाठी अकरा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे होते.त्यासाठी रविवार (२८जानेवारी) मतदान प्रक्रिया होऊन दुपारी चार नंतर मतमोजणी सुरुवात झाली.त्यामध्ये  आमदार मोनिका राजळे यांच्या नेतृत्वाखाली भाजपा प्रणीत आदिनाथ शेतकरी विकास मंडळाचे सर्वच्या सर्व १० उमेदवार मोठया मताने विजयी झाले.खरेदी विक्री संघाचे एकूण १७ संचालक असून यापूर्वीच आ. राजळे गटाचे ७ संचालक बिनविरोध निवडले गेले.सहकारी संस्था प्रतिनिधी मतदार संघाच्या १० जागेसाठी ११ उमेदवार निवडणुक रिंगणात होते.विरोधात फक्त एक अतिरिक्त उमेदवार राहिल्याने दहा जागेसाठी सकाळी आठ वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली. ९६ मतांपैकी ९५ मतदारांनी मतदान केले.त्यानंतर ४ वाजल्यानंतर मत मोजणी झाली त्यामध्ये खरेदी विक्री संघाच्या १० पैकी १० जागेवर आ.राजळे गटाचे उमेदवार निवडून आल्याने पुन्हा एकदा आमदार मोनिका राजळे यांनी सहकारावर आपले एकहाती वर्चस्व सिद्ध केले आहे.

निवडून आलेले उमेदवार व त्यांची मते:- भगवान आव्हाड ८७ , गंगाधर गर्जे ८९, कैलास देवढे ८८, राम पठाडे ८७, संदिप पठाडे ८६, भिमराव पालवे ८८, नवनाथ भवार ८६, विठ्ठल मरकड ८८, आण्णा वांढेकर ८९, मच्छिंद्र सावंत ८७ तर एकमेव विरोधी असलेले बाळु रावसाहेब शिरसाट यांना  १० मते मिळाली असुन ते पराभूत झाले आहेत. यापुर्वीच बिनविरोध निवडुण आलेले उमेदवार पुढील प्रमाणे – सिंधू अशोक साठे, सुनीता मधुकर काटे (महिला प्रतिनिधी) अशॊक लक्ष्मीनारायण मंत्री, बाबासाहेब श्रीपती चितळे (व्यक्तिगत सभासद प्रतिनिधी), पोपट मोहन कराळे (इतर मागास), पुरषोत्तम भास्कर हजारे ( वि जा भ ज), संतोष श्रीधर भागवत(अनु. जाती जमाती) या विजयानंतर आमदार मोनिका राजळे यांच्या नेतृत्वाखाली भाजपा प्रणित आदिनाथ शेतकरी मंडळाच्या समर्थकांनी फटाके फोडून जल्लोष साजरा केला.त्यानंतर पाथर्डी येथील आमदार मोनिका राजळे यांच्या संपर्क कार्यालयात सर्व संचालकांचा सत्कार करण्यात आला. 

यावेळी माणिक खेडकर, डॉ.मृत्युंजय गर्जे,नंदकुमार शेळके, सुभाष बर्डे, अशोक चोरमले, रामकिसन काकडे, संजय किर्तने, कुंडलिक आव्हाड, विष्णुपंत अकोलकर, नारायण पालवे, रवींद्र आरोळे, धनंजय बडे, पुरुषोत्तम आठरे, शुभम गाडे, सुनिल ओव्हळ, महादेव जायभाये, शेषराव कचरे, मंगल कोकाटे, बाळासाहेब गोल्हार, बबन बुचकुल, बाळासाहेब बटूळे, सचिन वायकर, हरिभाऊ धायतडक, संजय किर्तने, वामन किर्तने, पिराजी किर्तने, सचिन गायकवाड आदीसह भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

COMMENTS