Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पक्षाच्या बळकटीसाठी कार्यकर्त्यांनी निष्ठेने काम करावे : ना. जयंत पाटील

सातारा नगरपालिका निवडणूक लढवू का? असा प्रश्‍न दीपक पवारांनी विचारताच, असे का विचारता? पक्ष पातळीवर ही निवडणूक आपण लढवणारच आहोत. तुम्ही कामाला लाग

थंडीचा कडाका वाढल्याने ग्रामीण भागात शेकोट्या पेटल्या
विवाहित प्रेयसीसाठी बुरखा घालणार्‍या प्रियकरास चोर समजून बदडले
लाडक्या शेवंताचा क्लासी अवतार | फिल्मी मसाला | LokNews24 |

सातारा नगरपालिका निवडणूक लढवू का? असा प्रश्‍न दीपक पवारांनी विचारताच, असे का विचारता? पक्ष पातळीवर ही निवडणूक आपण लढवणारच आहोत. तुम्ही कामाला लागा. आणि सारखे वरती (पवार साहेबांकडे) जात जावू नका? मी आहे ना. पार्टीबद्दल काय असेल ते मला सांगत जावा, असे ना. जयंत पाटील यांनी दिपक पवार यांना सुचित केले.

सातारा / प्रतिनिधी : राष्ट्रवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आतापासून कामाला लागले पाहिजे. आगामी विधानसभेला आमदार राष्ट्रवादी पार्टीचाच झाला पाहिजे. कार्यकर्त्यांनी कंबर कसून निष्ठेने काम केल्यास यश मिळते. नवीन माणसे तयार करा, गावा-गावात राष्ट्रवादीची शाखा व घराघरात कार्यकर्ता निर्माण झाला पाहिजे, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष व जलसंपदा मंत्री ना. जयंत पाटील यांनी केले. दरम्यान, आ. श्री. छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले भाजपमध्ये गेल्यापासून जावली तालुक्यात राष्ट्रवादीची पडझड झाल्याचे दिसून येत असल्याच्या पार्श्‍वभूमिवर मेढा येथील एस. एस. पार्टे मंगल कार्यालयात आयोजित राष्ट्रवादी परिवार संवाद कार्यक्रमात ना. पाटील बोलत होते. याप्रसंगी पालकमंत्री ना. बाळासाहेब पाटील खा. श्रीनिवास पाटील, आ. शशिकांत शिंदे, प्रदेश युवक अध्यक्ष महेबुब शेख, युवक कार्याध्यक्ष रविकांत वरपे, प्रदेशाध्यक्ष युवती सक्सेना सलगर, प्रदेशाध्यक्ष युवक विद्यार्थी सुनील गव्हाणे, आयटी सेलचे प्रांतिक अध्यक्ष सारंग पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनील माने, राष्ट्रवादीच्या जिल्हा महिला समिंद्रा जाधव, युवा जिल्हाध्यक्ष तेजस शिंदे, त्याचप्रमाणे प्रदेश सरचिटणीस गोरख नलावडे, युवती जिल्हाध्यक्ष पुजा काळे, सभापती जयश्रीताई गिरी, राष्ट्रवादीच्या तालुका अध्यक्ष रूपाली भिसे, माजी सभापती बापूराव पार्टे, मोहनराव शिंदे, सुहासदादा गिरी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
आ. शशिकांत शिंदे म्हणाले, सातारा-जावली विधानसभा मतदारसंघात पुन्हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला उभा करून ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद व नगरपालिका निवडणुका तेवढ्याच ताकतीने लढवल्या जातील. जिल्ह्यात पुन्हा राष्ट्रवादी नंबर एकचा पक्ष बनवण्यासाठी सर्वजण प्रयत्न करू असे सूचित केले. बोंडारवाडी बरोबरच महू-हातगेघर, धरणाचा व धरणग्रस्तांचे प्रश्‍नाबाबत आ. शिंदे यांनी ऊहापोह केला.
यावेळी पालकमंत्री ना. बाळासाहेब पाटील, खा. श्रीनिवास पाटील यांनीही पक्ष संघटना वाढीसाठी सर्वांनी प्रयत्न करण्याचे आवाहन केले.
दीपक पवार यांनी प्रास्ताविक भाषणात तालुक्यातील पक्ष संघटनेचा आढावा सांगताना पक्षाचे अनेक पदाधिकारी अन्य पक्षात गेले. मात्र, अशा लोकांवर पक्षाने काहीच कारवाई केली नसल्याचे खंत त्यांनी व्यक्त करत धरणग्रस्तांचे प्रश्‍न मार्गी लावण्याची विनंती केली. राष्ट्रवादी परिवार संवाद कार्यक्रमास जावळी तालुक्यातून कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थीत होते. सुधिर पवार यांनी प्रास्ताविक व स्वागत केले. करून सुरेश पार्टे यांनी सुत्रसंचलन केले. रूपाली भिसे यांनी आभार मानले.

COMMENTS