Homeताज्या बातम्या

आ. काळेंमुळे दिव्यांग बांधवांचे जीवन सुखकर : शिंदे 

कोपरगाव : मतदारसंघातील दिव्यांग बांधवांना दैनंदिन जीवनात येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी आणि त्यांना स्वावलंबी बनवण्यासाठी आ. आशुतोष काळे सातत्याने प्रयत्न करीत आहे. कृत्रिम अवयव आणि सहाय्यक साहित्य वाटप शिबीर हा त्याचाच एक भाग असून यामुळे अनेक गरजू दिव्यांग बांधवांचे जीवन सुखकर झाले आहे असे प्रतिपादन कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे व्हा. चेअरमन प्रविण शिंदे यांनी केले आहे. शारीरिक अपंगत्वावर मात करून दिव्यांग बांधवांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी श्री भगवान महावीर विकलांग सहायता समिती मुंबई व आ. आशुतोष काळे यांच्या सहकार्यातून कोपरगाव मतदार संघातील दिव्यांग बंधू भगिनींना मोफत कृत्रिम अवयव आणि सहाय्यक साहित्य वाटप शिबिराचे उद्घाटन गुरुवार (दि.२५) रोजी काळे कारखान्याचे व्हा. चेअरमन प्रविण शिंदे व इतर मान्यवरांच्या हस्ते पार पडले. यावेळी ते बोलत होते.या शिबिराला उपस्थित असलेल्या दिव्यांग बंधू-भगिनींची तज्ज्ञ डॉक्टरांकडून तपासणी करण्यात आली. संपूर्ण दिवसभरात शेकडो दिव्यांग बांधवांची तपासणी झाली असून ज्या दिव्यांग बंधू भगिनींना कृत्रिम अवयवांची गरज आहे. अशा दिव्यांगांना कृत्रिम अवयव अचूक बसावे याकरिता तज्ज्ञ डॉक्टरांकडून अचूक हाता- पायाच्या कृत्रिम अवयवाचे मोजमाप घेण्यात आले असून उपस्थित दिव्यांग बंधू भगिनींची नोंदणी देखील करून घेण्यात आली. या दिव्यांग बांधवांना शुक्रवार (दि.२६) रोजी दुपारी २ वाजता आ. आशुतोष काळे यांच्या हस्ते कृत्रिम अवयवांसह व्हीलचेअर, ट्रायसिकल, कुबड्या, स्टिक, वॉकर, श्रवणयंत्र आदी सहाय्यक साहित्यांचे वाटप करण्यात येणार आहे.

थोरात कृषी महाविद्यालयात ‘खेती बचाव’ अभियान उत्साहात; शाश्वत शेती आणि जमीन सुपीकतेवर मार्गदर्शन
बापूंनी सहकारातून श्रीगोंदा तालुका सुजलाम सुफलाम केला ः गणेश शिंदे
अधी. अभियंता रणजीत हांडे यांची सीबीआय चौकशी करावी l लोकमंथन, लोकन्यूज 24 अशा धमक्यांना भीक घालत नाही l पहा LokNews24

COMMENTS