नगरमध्ये पेट्रोल भावाचा भडका, 119 रुपये व डिझेल 101 रुपये

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नगरमध्ये पेट्रोल भावाचा भडका, 119 रुपये व डिझेल 101 रुपये

अहमदनगर/प्रतिनिधी : युर्क्रेन व रशिया युद्ध आणि पाच राज्यांच्या निवडणुकांच्या निकालानंतर इंधनाचे दर भडकणार असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आता खरे ठरू लाग

पोलिसांची राज्यातील सर्वात मोठी कारवाई… ३१ हजार किलो गोमांस जप्त
अहमदनगर जिल्ह्यात नव्या ३७८० बाधितांची रुग्ण संख्येत भर
Ahmednagar : किरण काळे अदखलपात्र आहे तर जगतापांनी १ कोटीची नोटीस का पाठवली (Video)

अहमदनगर/प्रतिनिधी : युर्क्रेन व रशिया युद्ध आणि पाच राज्यांच्या निवडणुकांच्या निकालानंतर इंधनाचे दर भडकणार असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आता खरे ठरू लागले आहे. सोमवारी (4 एप्रिल) नगरमध्ये पेट्रोलचा भाव 118 रुपये 61 पैसे प्रति लिटरवर पोहोचला आहे. तर डिझेल 101 रुपये 33 पैसे प्रति लिटर झाले आहे. पेट्रोल डिझेलची नवीन किंमत चार एप्रिल पासून लागू करण्यात आली आहे.
अन्नधान्य, भाजीपाला, कपडे व सोने यासह शेतीमालाचे भाव गगनाला भिडले असून, गॅस सिलेंडरने तर नागरिकांनाच गॅसवर बसवले आहे. त्यात पेट्रोल-डिझेलच्या किमतींनी विक्रमी पातळी ओलांडली आहे. महागाईने उच्चांक गाठल्याने जनता त्रस्त झाली आहे. मागील 14 दिवसांत तब्बल 12 वेळा इंधनाचे भाव वाढले आहेत. या 14 दिवसांत पेट्रोल-डिझेलच्या किमती प्रतिलिटर 8 रुपये 40 रुपयांनी वाढल्या आहेत. मागील काही दिवसांपासून इंधन दरवाढीचा धडाका सुरू आहे. या इंधन दरवाढीने जनतेची होरपळ सुरू आहे.

COMMENTS