Homeताज्या बातम्या

दाऊद इब्राहिमच्या नावाने महसूल निरीक्षकाला धमकी

पुणे : शासकीय कामकाजात अडथळा आणण्यासाठी आणि कारवाईचा दबाव कमी करण्यासाठी एका महसूल निरीक्षकाला कुख्यात गुन्हेगारी टोळीचे नाव वापरून जीवे मारण्याच

अतिक्रमण हटाव मोहिमेत भेदभाव नको; सर्वांवर समान कारवाई करा-रतन गुजर
भाजी मंडईत केंद्रेकर यांनी आखून दिलेली ‘लक्ष्मण रेषा’ कुचकामी ठरणार काय?जनता फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष रिजवान बागवान यांचा सवाल
भररस्त्यात उमा भारतींनी तळले पोहे-जलेबी! गरिबांच्या पोटावर पाय देणाऱ्या प्रशासनाविरुद्ध अनोखे आंदोलन


पुणे : शासकीय कामकाजात अडथळा आणण्यासाठी आणि कारवाईचा दबाव कमी करण्यासाठी एका महसूल निरीक्षकाला कुख्यात गुन्हेगारी टोळीचे नाव वापरून जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याची गंभीर घटना पुण्यात उघडकीस आली आहे. या धमकीसोबतच खंडणीची मागणी करण्यात आल्याने महसूल विभागासह शासकीय वर्तुळात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
माहितीनुसार, संबंधित महसूल निरीक्षक आपल्या कार्यालयात नियमित कामकाज करत असताना त्यांना एका अनोळखी दूरध्वनी क्रमांकावरून संपर्क साधण्यात आला. समोरच्या व्यक्तीने स्वतःचा संबंध दाऊद इब्राहिमच्या गुन्हेगारी जाळ्याशी असल्याचा दावा करत अधिकार्‍याला थेट धमकी दिली. जमिनीसंबंधी वाद, अतिक्रमण हटविण्याच्या कारवाया आणि काही संवेदनशील प्रकरणांमध्ये हस्तक्षेप करू नये, अन्यथा गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशारा देण्यात आल्याचे समजते. याच संभाषणादरम्यान मोठ्या रकमेची खंडणी मागण्यात आल्याची माहितीही पुढे आली आहे. त्यामुळे ही केवळ धमकी नसून शासकीय अधिकार्‍यावर दबाव टाकण्याचा नियोजित प्रयत्न असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. संबंधित अधिकारी शासकीय जमिनींवरील अतिक्रमण हटविणे, अवैध वाळू उपसा रोखणे तसेच जमीन नोंदींमधील गैरव्यवहारांची चौकशी करणे अशा महत्त्वाच्या जबाबदार्‍या सांभाळत होते. अलीकडच्या काळात त्यांनी काही बेकायदेशीर बांधकामे आणि संशयास्पद जमीन व्यवहारांवर कठोर कारवाई सुरू केली होती. या कारवायांमुळे प्रभावित झालेल्या भूमाफियांनीच गुन्हेगारी जगतातील कुख्यात नावाचा आधार घेत अधिकार्‍याला घाबरविण्याचा प्रयत्न केला असावा, अशी शक्यता तपास यंत्रणांकडून व्यक्त केली जात आहे. कारवाई मागे घेण्यासाठी दबाव निर्माण करणे हा या धमकीमागील मुख्य उद्देश असू शकतो, असेही मानले जात आहे.
पोलिसांचा तपास वेगाने सुरू
घटनेनंतर महसूल निरीक्षकांनी तातडीने वरिष्ठ अधिकार्‍यांना माहिती देत पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत संबंधित कायदेशीर तरतुदींनुसार गुन्हा नोंदवला आहे.

COMMENTS