Homeताज्या बातम्यादेश

औषधांसह खाद्यपदार्थ झाले स्वस्त

गाडया महागणार ः ऑनलाईन गेमिंगवर टॅक्स लागू

नवी दिल्ली प्रतिनिधी - जीएसटी कौन्सिलच्या बैठकीत घेण्यात आलेले निर्णय मंगळवारी जाहीर करण्यात आले. अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांच्या अध्यक्षत

या आमदाराच्या पत्नीने केली आत्महत्या l LOK News 24
राष्ट्रवादीकडून पडळकर यांच्या विरोधात तक्रार दाखल.
दिल्लीत गॅंगवॉर भडकले… भरदिवसा कोर्टात कुख्यात गुन्हेगाराचा एन्काउंटर

नवी दिल्ली प्रतिनिधी – जीएसटी कौन्सिलच्या बैठकीत घेण्यात आलेले निर्णय मंगळवारी जाहीर करण्यात आले. अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली आणि यामध्ये ऑनलाईन गेमिंगला जीएसटी अंतर्गत आणणे, 28 टक्के कर लागू करणे आणि कर्करोगाच्या औषधांवरून जीएसटी काढून टाकणे यांसारखे अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले गेले.
जीएसटी कौन्सिलच्या बैठकीत ऑनलाईन गेमिंग, हॉर्स रेसिंग, कॅसिनोच्या संपूर्ण किमतींवर 28 टक्के जीएसटी लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ऑनलाईन गेमिंगला जीएसटी कायद्याच्या कक्षेत आणण्यात आले आहे. ऑनलाईन गेमिंगवर जीएसटी लावण्याच्या निर्णयाचं स्पष्टीकरण देताना अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी सांगितले की, या विषयावर सविस्तर चर्चा केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. चर्चेदरम्यान, आजच्या काळात ऑनलाईन गेमिंग उद्योगाचा प्रभाव किती आहे आणि त्यातून किती उत्पन्न मिळू शकते. या सर्व बाबींवर प्रत्येक राज्याशी चर्चा करून हा निर्णय घेण्यात आला आहे.
जीएसटी कौन्सिलने कार ग्राहकांना मोठा झटका दिला आहे. बैठकीदरम्यान विस्तृत चर्चा केल्यानंतर, सेडान कारवर 22 टक्के कंपनसेशन सेस लावण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे, जी 28 टक्के जीएसटी व्यतिरिक्त असेल. म्हणजेच, आता या श्रेणीतील वाहनं घेण्यासाठी अधिक खर्च करावा लागणार आहे. दरम्यान, अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी सांगितले की, सेडान कारवर 22 टक्के सेस लागू होणार नाही. चित्रपट गृहांमध्ये चित्रपट पाहायला गेल्यानंतर सर्वांची एकच तक्रार असले, ती म्हणजे, चित्रपट गृहांमध्ये मिळणारे खाद्यपदार्थ. आतापासून खाण्या-पिण्याच्या वस्तू स्वस्त होणार आहेत. या बैठकीत झालेल्या निर्णयांची माहिती देताना महसूल सचिव संजय मल्होत्रा म्हणाले की, सिनेमागृहांमधील खाण्यापिण्याच्या वस्तूंवरील जीएसटी कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या बैठकीपूर्वी सिनेमागृहांमध्ये उपलब्ध खाद्यपदार्थ आणि शीतपेयेवरील जीएसटी 18 टक्क्यांवरून 5 टक्क्यांपर्यंत कमी करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता. या प्रस्तावालाही परिषदेच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. जीएसटी कमी करण्याच्या घोषणेमध्ये न शिजवलेल्या वस्तूंवरील जीएसटी 18 टक्क्यांवरून 5 टक्के करण्यात आला आहे. म्हणजेच, आता कच्च्या किंवा न तळलेल्या गोष्टी स्वस्त झाल्या आहेत. याशिवाय इमिटेशन, जरीच्या धाग्यावरील कर 12 टक्क्यांवरून 5 टक्के करण्यात आला आहे.

कर्करोगावरील औषधे जीएसटीमुक्त – अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत घेण्यात आलेल्या इतर महत्त्वाच्या निर्णयांबद्दल बोलताना, आता आयात केलेल्या कर्करोगाच्या औषधांवर जीएसटी लावला जाणार नाही. म्हणजेच, हे औषध स्वस्त होणार आहे. जीएसटी कौन्सिलच्या या बैठकीत कॅन्सरवरील औषध ऊळर्र्पीीीुंळारल ची आयात स्वस्त होईल, अशी अपेक्षा आधीच व्यक्त केली जात होती. त्याला सरकारनं मंजुरी दिली आहे. दरम्यान, सध्या यावर 12 टक्के आयजीएसटी आकारला जातो, जो परिषदेने शून्यावर आणला आहे. या औषधाच्या एका डोसची किंमत 63 लाख रुपये आहे.

COMMENTS