Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नाबार्डच्या माध्यमातून सोनगाव-कुमठे रस्त्याच्या पूलासाठी 7 कोटी 30 लाखांचा निधी

सातारा / प्रतिनिधी : सातारा तालुक्यातील सोनगाव ते कुमठे, आसनगाव या मार्गावर उरमोडी नदीवर असणारा पूल छोटा आणि जुना असल्याने मोठ्या व अवजड वाहनांसा

पाचगणीच्या भुरळ घालणार्‍या नैसर्गिक सौंदर्यात सेल्फी पॉइंटची भर; पर्यटकांची तुफान गर्दी
लैंगिक अत्याचार प्रकरणी आरोपिस 10 वर्षाच्या सक्तमजुरीची शिक्षा
जनतेचे प्रश्‍न समजण्यासाठी जयंतरावांनी स्वतंत्र स्वीय सहायक नेमावा

सातारा / प्रतिनिधी : सातारा तालुक्यातील सोनगाव ते कुमठे, आसनगाव या मार्गावर उरमोडी नदीवर असणारा पूल छोटा आणि जुना असल्याने मोठ्या व अवजड वाहनांसाठी वाहतुकीला असुरक्षित आणि धोकादायक ठरत होता. या मार्गावरील वाहतूक सुरक्षित आणि दळणवळण सुलभ होण्यासाठी आ. श्री. छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या पाठपुराव्यातून उरमोडी नदीवर नवीन मोठा पूल बांधण्यासाठी नाबार्ड 27 अंतर्गत तब्ब्ल 7 कोटी 30 लाख 86 हजार रुपये निधी मंजूर झाला आहे.
सातारा शहरातून बोगद्याच्या पलीकडे सोनगावपासून शेळकेवाडी, भाटमरळी, पुढे कुमठे, आसनगांव आणि परिसरातील गावे राज्य मार्ग 140 ते सोनगाव, कुमठे, आसनगाव (प्रमुख जिल्हा मार्ग 31) या रस्त्याने सातारा शहराला जोडली गेली आहेत. सोनगाव ते कुमठे, आसनगांव या रस्त्यावर शेळकेवाडीजवळ उरमोडी नदीवर जुना पूल आहे. हा पूल छोटा व अरुंद असल्याने अवजड व मोठ्या वाहनांसाठी धोकादायक ठरत होता. तसेच पावसाळ्यात नदीला पूर आल्यानंतर हा पूल पाण्याखाली जाऊन वाहतूक पूर्णतः बंद ठेवावी लागते. त्यामुळे याठिकाणी नवीन मोठा पूल बांधणे अत्यावश्यक झाले होते.
यासंदर्भात आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी शासनस्तरावर पाठपुरावा करून नवीन पुल बांधण्याच्या कामासाठी नाबार्डमधून प्रशासकीय मान्यता मिळवून या कामाला 7 कोटी 30 लाख 86 हजार रुपये निधी मंजूर झाला आहे. लवकरच निविदा प्रक्रिया व इतर शासकीय सोपस्कार पूर्ण करून नवीन पूल उभारणीस प्रारंभ होणार आहे. हा नवीन पूल कमानी पध्दतीचा आणि मोठा असणार आहे. त्यामुळे नदीच्या पलीकडील शेळकेवाडी, भाटमरळी, आसनगांव, कुमठे आदी सर्वच गावांना याचा फायदा होणार आहे. तसेच पावसाळ्यात नदीला पूर आल्यानंतर बंद होणारी वाहतूक नवीन पुलामुळे सुरळीत होण्यास मदत होईल.

COMMENTS