Homeताज्या बातम्या

सज्जन-दुर्जन असा भेद न करता माऊलींनी सर्वांवर कृपा केली; ह.भ.प. श्री राम महाराज काजळे यांचे प्रतिपादन

बीड: श्री माऊली महाराज दादा हे सज्जन-दुर्जन, गरीब-श्रीमंत, शिक्षित-अशिक्षित, लहान-मोठा असा कोणताही भेदभाव न करता सर्वांवर आईप्रमाणे प्रेम करणारे,

श्री काळभैरवनाथ देवस्थान ट्रस्टच्या विश्वस्तपदी ढोरमले; जातेगाव येथे मान्यवरांच्या उपस्थितीत नियुक्तीपत्र प्रदान
कोचिंग क्लासेसच्या विळख्यात कनिष्ठ महाविद्यालये; शिक्षणाचा बाजार आणि प्रशासनाचे मौन!नामधारी कॉलेजांचा सुळसुळाट, गुणवत्तापूर्ण महाविद्यालये मात्र विद्यार्थ्यांविना; शिक्षण व्यवस्थेतील गंभीर संकटाकडे शिक्षण विभागाचे  दुर्लक्ष
वाहनांना हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन (एचएसआरपी)नंबरप्लेट 30 जुन पुर्वी बसविणे बंधनकारक

बीड: श्री माऊली महाराज दादा हे सज्जन-दुर्जन, गरीब-श्रीमंत, शिक्षित-अशिक्षित, लहान-मोठा असा कोणताही भेदभाव न करता सर्वांवर आईप्रमाणे प्रेम करणारे, कृपा व आशीर्वाद देणारे वात्सल्यमूर्ती होते. त्यांनी संपूर्ण आयुष्य जगाच्या कल्याणासाठी आणि भक्तांच्या उद्धारासाठी वेचले, असे प्रतिपादन ह.भ.प. मृदंग महामेरू श्री राम महाराज काजळे यांनी केले.

श्री माऊली महाराज यांच्या २६ व्या पुण्यस्मरण सोहळ्यानिमित्त आयोजित ज्ञानेश्वरी पारायणात व्यासपीठ अधिकारी प्रमुख म्हणून अनेक वर्षांपासून सेवा बजावत असलेल्या श्री काजळे महाराजांनी ओव्यांच्या संदर्भातील चिंतन मांडताना हे विचार व्यक्त केले. ते पुढे म्हणाले की, माऊलींनी त्यांच्या भेटीस आलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात आनंद, समाधान आणि आशीर्वादाचे दान दिले. अखंड नामस्मरण आणि निरंतर अन्नदान ही जीवनमूल्ये त्यांनी आयुष्यभर जपली. लाखो-कोट्यवधी भाविकांना सन्मार्ग दाखवून त्यांच्या जीवनाचा उद्धार केला.

श्री काजळे महाराज यांनी सांगितले की, माऊलींच्या पुण्यतिथी सोहळ्यात सेवा करण्यासाठी अनेक भक्त गेली २६ वर्षे आपले गाव व घरदार सोडून चाकरवाडी येथे मुक्कामी राहतात. माऊली हाच ध्यास आणि माऊली हाच देव अशी भावना या भक्तांच्या मनात आहे. माऊलींवर नितांत श्रद्धा ठेवून त्यांच्या शिकवणीनुसार चालणाऱ्यांचा उद्धार झाला. तसेच जे त्यांच्या मार्गावर पूर्णपणे चालू शकले नाहीत, त्यांनाही माऊलींनी आपल्या कृपेने तारले, असेही त्यांनी नमूद केले. आज माऊलींच्याच पावलावर पाऊल ठेवत श्री महादेव महाराज तात्या आणि श्री नारायण महाराज भाऊ हे भक्तीचा हा मळा अधिक जोमाने फुलविण्यासाठी व समाजकल्याणासाठी अहोरात्र परिश्रम घेत आहेत. त्यांच्या कार्यामुळे माऊलींची परंपरा आणि सेवा भाव अधिक व्यापक होत असल्याचे श्री काजळे महाराज यांनी सांगितले.

COMMENTS