बीड : पाटोदा तालुक्यातील धनगर जवळका येथील ज्येष्ठ, प्रेमळ व अध्यात्मिक व्यक्तिमत्त्व म्हणून ओळख असलेल्या मंडूबाई उमाजीराव मोरे यांचे वयोमानान

बीड : पाटोदा तालुक्यातील धनगर जवळका येथील ज्येष्ठ, प्रेमळ व अध्यात्मिक व्यक्तिमत्त्व म्हणून ओळख असलेल्या मंडूबाई उमाजीराव मोरे यांचे वयोमानानुसार 105 व्या वर्षी दि. 20 एप्रिल 2026 रोजी राहत्या घरी शांतपणे निधन झाले. त्यांच्या निधनाने परिसरात मोठी हळहळ व्यक्त होत असून मोरे परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
मंडूबाई मोरे या बीड जिल्हा पोलीस दलातील सहाय्यक पोलीस निरीक्षक आर.यु. मोरे व एल.यु. मोरे यांच्या तसेच भरत उमाजी मोरे यांच्या मातोश्री होत. त्या राहुल मोरे यांच्या आजी होत्या. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही त्यांनी आपल्या मुलांचे संगोपन करत शिक्षणाला प्राधान्य दिले. शिका, मोठे व्हा हा त्यांचा कायमचा संदेश होता. त्यांच्या मार्गदर्शनामुळेच पुढील पिढीतील अनेक सदस्य डॉक्टर, वकील, इंजिनिअर, तसेच विविध व्यवसाय व सामाजिक क्षेत्रात कार्यरत असून काही जण देशाबाहेरही कार्य करत आहेत. साधेपणा, कष्टाळूपणा, शिस्त आणि मूल्याधिष्ठित जीवन हे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे वैशिष्ट्य होते. आपल्या कुटुंबात त्यांनी प्रामाणिकपणा, कर्तव्यनिष्ठा आणि समाजाप्रती बांधिलकीचे संस्कार रुजवले. त्यांच्या प्रेमळ स्वभावामुळे आणि धार्मिक वृत्तीमुळे त्या परिसरात आदराचे स्थान प्राप्त करून होत्या. त्यांच्या पश्चात तीन मुले, दोन मुली, सुना, नातवंडे, पतवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांच्या अंत्यविधीसाठी स्थानिक ग्रामस्थ, विविध क्षेत्रातील मान्यवर व नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

COMMENTS