Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मालेगाव स्फोट प्रकरणाला नवे वळण; चारही आरोपींची दोषारोप पत्रातून मुक्तता

मुंबई : २००६ सालचा तो काळजाचा ठोका चुकवणारा मालेगाव बॉम्बस्फोट… ज्या घटनेने संपूर्ण देश हादरला होता. आता या प्रकरणातील सर्व चार प्रमुख आरोपींना म

भुसावळमध्ये नगराध्यक्षा गायत्री भंगाळे यांचे नगराध्यक्षपद रद्द; जात प्रमाणपत्र अवैध ठरल्याने केली कारवाई
मोबदला दिल्यानंतरच महामार्गाचे काम करा; शिरूर-बेल्हे महामार्गाबाबत उच्च न्यायालयाचे आदेश
सातव्या वेतन आयोगाचा निर्णय महापालिकेच्या गळ्यात; व्याजापोटीच 3.43 कोटींचा अतिरिक्त भार
मालेगांव ब्लास्ट केस में NIA का एक और गवाह पलटा, पहले किये थे बड़े खुलासे -  Another witness in 2008 Malegaon blast case hostile 31 so far - News18 हिंदी

मुंबई : २००६ सालचा तो काळजाचा ठोका चुकवणारा मालेगाव बॉम्बस्फोट… ज्या घटनेने संपूर्ण देश हादरला होता. आता या प्रकरणातील सर्व चार प्रमुख आरोपींना मुंबई उच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. लोकेश शर्मा, धन सिंग, राजेंद्र चौधरी आणि मनोहर नरवारिया… या चौघांवरील दोषारोप निश्चित करणारा कनिष्ठ न्यायालयाचा आदेश हायकोर्टाने रद्द केला आहे. तांत्रिक दृष्ट्या हे आरोप टिकत नसल्याचं सांगत न्यायालयाने ही खटल्याची प्रक्रियाच संपुष्टात आणली आहे.
मशिदीजवळ झालेल्या या साखळी स्फोटात ३७ निष्पाप नागरिकांचा बळी गेला होता. यापूर्वी ११ जणांची निर्दोष मुक्तता झाली होती, आणि आता उरलेल्या चारही आरोपींवरील आरोपपत्र रद्द झाल्याने एक मोठी कायदेशीर लढाई तूर्तास थांबली आहे.
पण खरा प्रश्न अजूनही शिल्लक आहे! जर सर्वच आरोपींची निर्दोष मुक्तता झाली असेल, तर मग ३७ जणांचा जीव घेणारा तो स्फोट नेमका घडवला कुणी? एनआयए आता या निकालावर वरच्या न्यायालयात दाद मागणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

COMMENTS