Homeताज्या बातम्याविदेश

अमेरिकेतील पश्चिम टेक्सासमधील फॅमिली डेअरी फार्ममध्ये  स्फोट

आग लागून 18 हजारहून अधिक गायींचा मृत्यू

टेक्सास प्रतिनिधी - अमेरिकेतील टेक्सास येथे भीषण दुर्घटना घडली आहे. एका डेअरी फार्ममध्ये भीषण स्फोट होऊन लागलेल्या भीषण आगीत होरपळून 18 हजार

नागवडे कारखान्याची बदनामी थांबवा.. आरोप सिद्ध झाल्यास राजीनामा देऊ
स्वामींची कृपा झाली आणि भावाला पोलिसांनी सोडले…| Shree Swami Samartha Anubhav | Swami Samarth (Video)
मुक्रमाबाद येथे संत शिरोमणी गोरोबा काका पुण्यतिथी सोहळा उत्साहात संपन्न;ह.भ.प. रंगनाथ महाराज कंधारकर यांच्या कीर्तनाने मुक्रमाबाद नगरी दुमदुमली

टेक्सास प्रतिनिधी – अमेरिकेतील टेक्सास येथे भीषण दुर्घटना घडली आहे. एका डेअरी फार्ममध्ये भीषण स्फोट होऊन लागलेल्या भीषण आगीत होरपळून 18 हजार गायी ठार झाल्या आहेत. अमेरिकेत गोदामात लागलेली ही आतापर्यंतची सर्वात भीषण आग असल्याचं वृत्त रॉयटर्सने दिलं आहे. स्फोटाचं कारण अद्याप समोर आलेलं नाही. दरम्यान डेअरी फार्मची मालकी असणाऱ्या कुटुंबानेही आतापर्यंत या घटनेवर काही भाष्य केलेलं नाही. Dimmitt शहराजवळ असणाऱ्या South Fork Dairy मध्ये झालेल्या स्फोटात एक व्यक्तीही गंभीर जखमी झाला आहे. फार्ममधील मशिनरीमुळे मिथेन वायू पेटला असावा, असा अधिकाऱ्यांचा प्राथमिक अंदाज आहे. अमेरिकेत 2018 ते 2021 दरम्यान जवळपास 30 लाख प्राण्यांचा आगीत होरपळून मृत्यू झाला आहे. 

  आगीत होरपळून नेमक्या किती गाईंचा मृत्यू झाला आहे याची नेमकी माहिती मिळाली नाही. पण शेरीफ कार्यालयाने जवळपास 18 हजार गाई ठार झाल्याचं सांगितलं आहे. शेरीफ Sal Rivera यांनी आग ‘honey badger’ नावाने ओळखल्या जाणार्‍या मशीनने लागली असावी असा अंदाज असल्याचं सांगितलं आहे. ही मशीन व्हॅक्यूम जे खत शोषतं आणि पाणी बाहेर काढतं. कदाचित मशीन जास्त गरम झाले आणि कदाचित मिथेन आणि त्यासारख्या गोष्टी पेटल्या आणि पसरल्या व स्फोट झाला असं ते म्हणाले आहेत. वॉशिंग्टन डीसी येथील प्राणी कल्याण संस्थेने जर 18 हजार गायींचा मृत्यू झाल्याला दुजोरा मिळाला तर हा आतापर्यंत गुरांच्या गोठ्यातील 2013 मध्ये आकडेवारी ठेवण्यास सुरुवात झाल्यापासून सर्वात प्राणघातक आग असेल असं सांगितलं आहे.

COMMENTS