आवाज करू नये म्हणून…वासरांना लावला चिकट टेप

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

आवाज करू नये म्हणून…वासरांना लावला चिकट टेप

पाच वासरे मृत, कत्तलीसाठी नेल्या जाणार्‍या 59 जनावरांची सुटका

अहमदनगर/प्रतिनिधी : तीन पिकअप वाहनांतून कत्तलीसाठी घेऊन जाणार्‍या जनावरांची सुटका करण्यात हिंदुत्ववादी संघटनेच्यामदतीने एमआयडीसी पोलिसांना यश आले आहे

नगरच्या विकासासाठी कुणाशीही आघाडी करायला आम्ही तयार-खासदार सुजय विखे | आपलं नगर | LokNews24 |
निवडणूक निरीक्षक अजयकुमार बिश्त शिर्डीत दाखल
प्रशासनाला जाग येण्यासाठी स्वयंसेवी संस्थाचा कँडल मार्च

अहमदनगर/प्रतिनिधी : तीन पिकअप वाहनांतून कत्तलीसाठी घेऊन जाणार्‍या जनावरांची सुटका करण्यात हिंदुत्ववादी संघटनेच्यामदतीने एमआयडीसी पोलिसांना यश आले आहे. वाहतूक करताना पाच कालवडी मृत झाल्या असून गायी व वासरे अशा लहान-मोठ्या 59 जनावरांची सुटका करण्यात आली आहे. जनावरांच्या चारा-पाण्याची व्यवस्था न करता तसेच जनावरांच्या वाहतुकीचा कोणताही परवाना नसताना कत्तलखान्यात घेऊन जात असताना मिळून आले आहेत. या कारवाईत पोलिसांनी तीन वाहनासह चार लाख 37 हजाराचा मुद्देमाल जप्त केला. दरम्यान, वाहतूक करताना वासरांनी आवाज करू नये म्हणून त्यांच्या तोंडाला चिकट टेप लावून क्रूरतेचा कळस गाठण्यात आला होता, असे हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे.

शनिवारी रात्री नगर-मनमाड रोडवरील सह्याद्री चौकात ही कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात दोन वेगवेगळे गुन्हे दाखल झाले आहेत. पोलिस अंमलदार सुभाष दामोधर म्हस्के यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कैफ आलीम काकर (वय 18), साबीर समीर चौगुले (वय 19, दोघे रा. बेल्हे, आळेफाटा, ता. जुन्नर, जि. पुणे), जाकीर रशीद शेख (वय 35 रा. घोडेगाव ता. नेवासा), शहेबाज गुलामसाबीर सय्यद (वय 18 रा. चांदा ता. नेवासा) अशी गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तींची नावे आहेत. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे. हे चौघेजण त्यांच्या ताब्यातील पिकअप (एमएच 14 डीएम 4926) व पिकअप (एमएच 16 एवाय 7369) मधून तीन जर्सी गायी, 17 कालवडी, तीन वासरे वाहतूक करताना मिळून आले. यातील दोन कालवडी मृत झाल्या आहेत. पोलिसांनी दोन्ही पिकअप, जनावरे असा चार लाख 37 हजार रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे. दुसरी फिर्याद व्हेटरनरी डॉ. आप्पासाहेब बाबासाहेब नाईकवाडी (वय 38, रा. तांदुळनेर, ता. राहुरी) यांनी दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शेख युनूस फत्तेमोहंमद (वय 33) व मुक्तदीर आमीन कुरेशी (वय 20, दोघे रा. मदिरानगर, वॉर्ड नं 1, संगमनेर) यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे दोघे त्यांच्या ताब्यातील पिकअपमधून (एमएच 15 एफव्ही 0027) 41 कालवडींची वाहतूक करताना मिळून आले आहेत. त्यातील तीन कालवडी मृत झाल्या आहेत. पोलिसांनी पिकअपसह कालवडी असा दोन लाख 32 हजार रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे. कोयता व चाकूने धमकावले डॉ. नाईकवाडी यांच्या फिर्यादीतील आरोपी शेख युनूस फत्तेमोहंमद व मुक्तदीर आमीन कुरेशी या दोघांनी पिकअप पकडल्यानंतर पोलिसांसह डॉक्टरांना कोयता व चाकूने धमकवण्याचा प्रयत्न केला असल्याचे फिर्यादी म्हटले आहे. या दोन्ही गुन्ह्यांचा तपास पोलीस नाईक संदीप चव्हाण करीत आहेत. राज्यात लम्पी आजारामुळे गोवंशाच्या वाहतुकीला परवानगी नसताना तसेच अवैधरित्या गोवंश कत्तलीसाठी घेऊन जात असताना त्यांनी भरधाव वेगाने वाहन चालवून त्यामध्ये असलेली वासरे मरण पावल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

51 नवजात वासरांचा समावेश
एमआयडीसी पोलिस ठाण्याचे पोलिस अधिकारी युवराज आठरे तसेच त्यांचे सहकारी राहुल कांडेकर, महेश पाटील, रवींद्र पवार व पोलिस प्रशासन तसेच गोरक्षक डॉ. आबासाहेब नायकवाडे व शेकडो गोरक्षकांच्या मदतीने कत्तलखान्याकडे निघालेल्या वाहनांवर कारवाई केली असता यात 61 गोवंश आढळून आले. या सर्वांची सुटका करण्यात आली, असे निसर्गसृष्टी गोपालन संस्थेचे प्रमुख गौतम कराळे यांनी सांगितले. या कारवाईतील हृदयद्रावक घटना म्हणजे यातील दोन नवजात वासरांची आवाज करू नये म्हणून धावत्या गाडीमध्येच हत्या करण्यात आली तर इतरांच्या तोंडाला चिकट टेप लावण्यात आले होते. अतिशय क्रूरतेने हे काम करण्यात आले असून संस्थेत भेट दिली तर या विषयांचे गांभीर्य लक्षात येईल, असे स्पष्ट करून कराळे म्हणाले, सुटका झालेले गोवंश निसर्गसृष्टी गोपालन संस्थेमध्ये सुखरूप असून येथेच त्यांचे संगोपन करण्यात येणार आहे. अचानक वाढलेला आकडा आणि दोन चार दिवसांची नवजात वासरे असल्याने त्यांच्या संगोपनाचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. त्यामुळे स्वतःहून पुढे या आणि या नवजात वासरांच्या दुधासाठी आणि गोवंशाचे संगोपन करण्यासाठी सढळ हाताने मदत करा. कोणत्याही शासकीय मदतीशिवाय हा खर्च भागवला जातो. म्हणून ऑनलाईन किंवा वस्तुरूप मदत पाठवायची असेल तर प्रा. गौतम कराळे – 7387777383, वैद्य विलास जाधव – 9420797476, अपूर्व गुजराती – 9225322793, विश्‍वास बेरड – 9172738455, मुकुल गंधे -9890336777, गजेन्द्र सोनवणे – 9422727726, भूषण भणगे – 9890709997 व श्रीनिधी सोमाणी – 9767896994 यांच्याशी संपर्क साधावा.

COMMENTS