Homeताज्या बातम्या

नांदेडमध्ये खळबळ; प्री-स्कूलच्या नावाखाली बोगस इंग्रजी शाळांचा सुळसुळाट, शिक्षण विभागाचे मौन संशयास्पद

नांदेड : शहरातील मालेगाव रोड परिसरात प्री-स्कूलच्या नावाखाली अनधिकृतपणे इंग्रजी माध्यमाच्या शाळा चालवल्या जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला

नांदेडमध्ये ‘ऑपरेशन क्रॅक डाऊन’; प्रिस्क्रिप्शनशिवाय नशेच्या गोळ्या विकणाऱ्या दोन मेडिकलवर छापा
नांदेडमध्ये ‘जवाब दो महामोर्चा’; विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक
‘ऑपरेशन टायगर’ केवळ अफवांचा बाजार; संभ्रम पसरवण्याचा डाव : खा. नागेश पाटील आष्टीकर
Education Scam : दिव्यांग बोगस शिक्षकांवर सीईओ यांची कारवाई

नांदेड : शहरातील मालेगाव रोड परिसरात प्री-स्कूलच्या नावाखाली अनधिकृतपणे इंग्रजी माध्यमाच्या शाळा चालवल्या जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आवश्यक शासकीय मान्यता आणि यू-डायस (U-DISE) क्रमांक नसतानाही या शाळा सर्रास सुरू असल्याने शिक्षण विभागाच्या भूमिकेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. या बोगस शाळांवर ठोस कारवाई होत नसल्याने संस्थाचालक आणि शिक्षण विभागातील काही अधिकार्‍यांचे आर्थिक हितसंबंध असल्याचा गंभीर आरोप आता पालक व सामाजिक क्षेत्रातून केला जात आहे.

मालेगाव रोड परिसरात अनेक संस्थांनी केवळ बालशिक्षणाच्या (प्री-स्कूल) नावाखाली परवानगी घेतली असताना, प्रत्यक्षात तिथे पहिली ते पुढील वर्गांचे इंग्रजी माध्यमाचे वर्ग बेकायदेशीरपणे भरवले जात आहेत. शिक्षण हक्क कायदा (RTE) आणि शासनाच्या नियमांना हरताळ फासत या शाळांमध्ये प्रवेश प्रक्रिया राबवून पालकांकडून लाखो रुपयांची फी लुटली जात आहे. शासनमान्यता, पात्र शिक्षक आणि सुरक्षित इमारत नसलेल्या या शाळा विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळत आहेत.

याहून धक्कादायक बाब म्हणजे, या अनधिकृत शाळांमध्ये शिक्षकांचे प्रचंड आर्थिक आणि मानसिक शोषण होत आहे. उच्चशिक्षित शिक्षकांना अत्यंत कमी मानधनावर कायदेशीर सेवा सुरक्षा, पीएफ (PF) किंवा कोणत्याही शासकीय सुविधेविना अतिरिक्त तास काम करण्यास भाग पाडले जात आहे. नोकरी जाण्याच्या भीतीने शिक्षक उघडपणे बोलू शकत नसल्याने हे शोषण सुरूच आहे. मालेगाव रोड परिसरातील या कथित बोगस शाळांची, त्यांच्या मान्यतांची आणि शिक्षकांच्या शोषण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कठोर फौजदारी कारवाई करण्याची मागणी आता नांदेडकरांमधून जोर धरू लागली आहे.

COMMENTS