Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

थंडीच्या लाटेने मुंबईसह राज्यात पारा घसरला

मुंबई : उत्तर भारतातील तीव्र थंडीची लाट आणि बर्फवृष्टीचा परिणाम महाराष्ट्रातही जाणवत आहे. त्यामुळे मुंबईसह उर्वरीत राज्यातील तापमानात कमालीची घट

अवकाळी पावसाने हिरावला शेतकऱ्याचा तोंडाला आलेला घास 
शेतकर्‍यांमागे कर्ज वसुलीचा तगादा नको ः मुख्यमंत्री शिंदे
कांद्यापाठोपाठ आता लसूण महागला

मुंबई : उत्तर भारतातील तीव्र थंडीची लाट आणि बर्फवृष्टीचा परिणाम महाराष्ट्रातही जाणवत आहे. त्यामुळे मुंबईसह उर्वरीत राज्यातील तापमानात कमालीची घट झाली असून मुंबईकरही यंदा गुलाबी थंडीची मजा लुटत आहेत. मुंबईत यंदाच्या मोसमातील सर्वांत कमी तापमानाची नोंद झाली आहे.

भारतीय हवामान खात्यानुसार (आयएमडी) मुंबईत सोमवारी सकाळी पारा 13.8 अंशावर पोहोचला आहे. हे यंदाच्या हिवाळ्यातील सर्वांत नीचांकी तापमान आहे. मुंबईत पुढील दोन दिवस थंडीची लाट कायम असणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. मुंबईत रविवारी दिवसाच्या कमाल तापमानामध्येही घट झाली आहे. रविवारी कमाल तापमान 26.2 अंश सेल्सिअसवर पोहोचले आहे. हे तापमान सामान्य तापमानापेक्षा पाच अंश कमी आहे. या हिवाळ्यात आतापर्यंतचे सर्वांत कमी तापमान 25 डिसेंबर रोजी 15 अंश सेल्सिअस नोंदवले गेले होते. त्यानंतर आज 13.8 अंश तापमानाची नोंद झाली आहे. दुसरीकडे उत्तर महाराष्ट्रातील सातपुड्याच्या डोंगर रांगामध्ये कडाक्याची थंडी पडत असून तापमान कमी झाले आहे. सातपुड्याच्या डोंगर रांगामधील शेतात आणि रस्त्याच्या बाजूला असलेले गवत, तसेच वाहने घराच्या बाहेर ठेवल्या वस्तूंवर असलेले दव बिंदू गोठल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. सातपुड्याच्या दुर्गम भागात पांढरी चादर पसरल्याचे चित्र पाहण्यास मिळत आहे. उत्तरेकडून येणार्‍या थंड वार्‍यामुळे येथे 5 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. अक्कलकुवा तालुक्यातील दाब आणि वालंबा गावात अचानक तापमान घटल्यामुळे दव बिंदू गोठल्याची नोंद झाली आहे. पुढील तीन ते चार दिवस थंडीची तीव्रता असेल आणि हवामान कोरडं राहिल, असा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे.

COMMENTS